Thursday, September 19, 2024
Homeताज्या बातम्याब्रेकिंग : गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजार रुपयांची वाढ

ब्रेकिंग : गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजार रुपयांची वाढ

मुंबई : आरोग्य विभागाच्या गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजार रुपयांची भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या निर्णयामुळे आरोग्य विभागातील गटप्रवर्तकांच्या मानधनात लक्षणीय वाढ होणार आहे. (group promoters)

आरोग्य क्षेत्रात गटप्रवर्तकांना आशाताईंच्या कामावर पर्यवेक्षण ठेवणे आणि क्षेत्रीय भेटी घेणे आवश्यक असते. या महत्त्वपूर्ण कामांची दखल घेत, त्यांना वाढीव मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे वाढीव मानधन एप्रिल २०२४ पासून लागू केले जाईल. (group promoters)

या वाढीव मानधनासाठी सुमारे १७ कोटी ५९ लाख रुपयांच्या वार्षिक खर्चाची व्यवस्था करण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजुरी घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गटप्रवर्तकांच्या कामात प्रोत्साहन मिळेल आणि आरोग्य क्षेत्रातील सेवा अधिक प्रभावीपणे पार पाडता येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव यांना अटक

मोठी बातमी : कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ; केंद्र सरकारकडून युनिफाइड पेन्शन योजनेला मंजूरी

ब्रेकिंग : पुणे सह पाच जिल्ह्यात रेड अलर्ट

लाडकी बहीण योजनेच्या ३१ जुलै नंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू, पात्र महिलांना लवकरच लाभ

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

IRDAI : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय