Tuesday, October 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : दिघी, चिखलीतील विजेचा प्रश्न निकाली! वीजवाहिन्यांच्या कामाचा शुभारंभ

PCMC : दिघी, चिखलीतील विजेचा प्रश्न निकाली! वीजवाहिन्यांच्या कामाचा शुभारंभ

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – भोसरी विधानसभा मतदारसंघातील दिघी, चिखली, जाधववाडी, सोनवणेवस्ती परिसरातील विजेचा प्रश्व निकाली निघणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते भूमिगत वीजवाहिन्या टाकणे, रोहित्राची क्षमता वाढविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाणही घटणार आहे. (PCMC)

चिखलीतील सोनवणेवस्तीमधील रोहित्राची क्षमता वाढविण्यात येणार आहे. तेथे 315 ऐवजी 630 केव्हीचा रोहित्र बसिण्यात येत आहे. राम मंदिरा, गाथा कॉलनी, पाटीलनगर भागातील विद्युत वाहिनी भूमीगत टाकण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण कमी होणार आहे.

विकास आश्रम, चिखली गावठाण येथे अतिभारीत विद्युत वाहिनीस पर्यायी केबल टाकण्यात येत आहे. चिखली भागासाठी नवीन फिडरपीळ बसविण्यात येत आहे. सोनवणे वस्तीमधील जुन्या झालेल्या वाहिन्या बदलल्या जाणार आहेत. तिथे नवीन वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. शेलारवस्ती, आंबेडकर भवन येथील वाहिन्या भूमिगत टाकल्या जाणार आहेत. जाधववाडीतील बोल्हाईमळा येथे नवीन ट्रान्सफार्मर उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. (PCMC)

त्यामुळे या भागातील वीजपुरवठा सुरळीत होणार आहे. दिघीतील साई पार्क, माऊलीनगर परिसरातील वीज वाहिन्या भूमिगत करण्यास सुरुवात झाली आहे.

जास्त क्षमतेची रोहित्र बसवण्यास सुरवात

समाविष्ट भागातील विविध गावांमधील रोहित्रांची क्षमता कमी होती. जास्त क्षमता असलेले रोहित्र बसविण्यास सुरुवात झाली आहे. अनेक भागातील विद्युत वाहिन्या रस्त्यावर होत्या. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारत येत नाही. त्यासाठी विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे. यामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होणार नाही.

महेश लांडगे, आमदार भोसरी विधानसभा, भाजप

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश

SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?

आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास

Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती

School Job : त्रिमूर्ती हायस्कूल अंतर्गत भरती; पात्रता फक्त 12वी पास

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

संबंधित लेख

लोकप्रिय