Thursday, October 10, 2024
Homeराज्यMumbai : नेत्रदान करा, नेत्रदान ही लोक चळवळ बनावी - राज्यपाल सी.पी....

Mumbai : नेत्रदान करा, नेत्रदान ही लोक चळवळ बनावी – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. 17:– नेत्रदान हे महान कार्य असून या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यानंतर इतरांच्या माध्यमातून जगू शकतो. यासाठी नेत्रदान ही लोक चळवळ बनावी आणि सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. (Mumbai)

राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांच्या संकल्पनेतून जे.जे. रुग्णालय आणि राजभवन यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन येथे 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 या कालावधीत नेत्रदान संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा आज राज्यपालांच्या हस्ते नेत्रदान कार्ड देऊन गौरव करण्यात आला. राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सह सचिव श्वेता सिंघल, जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, नेत्र शल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ.सुजाता चहांदे आदी यावेळी उपस्थित होते. (Mumbai)

राज्यपाल म्हणाले, कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू हा वेदनादायी असतो, तथापि त्यांच्या अवयवांच्या माध्यमातून इतर गरजूंना नवीन आयुष्य मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त राजभवन येथे आयोजित नेत्रदान संकल्प अभियानात 740 जणांनी संकल्प करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, प्रत्यक्षात एक हजारांहून अधिक फॉर्म भरले गेले. याबाबत समाधान व्यक्त करून हा प्रतिसाद पाहता पुढील वर्षी पंतप्रधानांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 7500 संकल्पाचे उद्दिष्ट ठेवू या, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : मलायकाच्या वडिलांची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

शेतात काम करताना विद्युत तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

JCI : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय