Wednesday, January 15, 2025
HomeNewsआंबेगाव : भोसरी ते घोडेगाव पीएमपीएमएल बससेवा सुरू

आंबेगाव : भोसरी ते घोडेगाव पीएमपीएमएल बससेवा सुरू

घोडेगाव / अविनाश गवारी : भोसरी ते घोडेगाव अशी पीएमपीएमएल ची बससेवा सुरू झाली. दरम्यान एसटीच्या संपकाळात ही बस सुरू झाल्याने उत्तर नोकरदार, व्यावसायिक, विदयार्थी व इतर प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

घोडेगाव शहरामध्ये पीएमपीएमएलच्या बसचे आगमन होताच घोडेगाव ग्रामस्थांनी बसची घोडेगाव परीसरातून ढोल-ताशांच्या आवाजात, फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढली. तसेच पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला. 

याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती कैलास काळे, पंचायत समिती सदस्या अलका घोडेकर, जयसिंगराव काळे, शाम होनराव, ज्ञानेश्वर घोडेकर, भाजपाचे डॉ. ताराचंद कराळे, जयसिंगराव एरंडे, राजेश काळे, विजय पवार, भानुदास काळे, शिवसेनेचे तुकाराम काळे, प्रशांत काळे, उल्हास काळे, मनसेचे संतोष बो-हाडे, संतोष काळे, स्वप्निल घोडेकर, गणेश घोडेकर, अनिल घोडेकर, दशरथ काळे, नितिन काळे, रूपाली झोडगे, राजेश्वरी काळे, रत्ना गाडे, नवनाथ काळे, गजानन काळे आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. 

तसेच पीएमपीएमएल भोसरी डेपोचे सुनिल चव्हाण, कुंदन काळे, दिपक ओव्हाळ, अस्लम तांबोळी, दिपक गायकवाड, निलेश शेलार, राजेश नायकोडी, दिपक सुर्यवंशी, योगेश चौधरी, अमोल गावडे, सखाराम भोईर, अतुल काळे आदि उपस्थित होते.

दरम्यान भोसरी ते घोडेगाव व घोडेगाव ते मंचर या मार्गावर पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेल्या बसला आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अॅड. नितीन लांडगे, जयसिंगराव काळे यांनी भोसरीतील बीआरटीएस टर्मिनलमध्ये उद्घाटन करून बस भोसरी – घोडेगाव सुरू केली.

संबंधित लेख

लोकप्रिय