जुन्नर (प्रतिनिधी) : आंबे-पिंपरवाडी गावचे सरपंच मुकुंद घोडे यांनी मनरेगा अंतर्गत १ हजार वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याची मागणी पंचायत समितीकडे केली होते. या कामाला मंजूर मिळाली आहे.
आंबे पिंपरवाडी येथे कृषी दिनाचे औचित्य साधून मनरेगा अंतर्गत नव्याने १००० वृक्ष लागवडीला सुरुवात करण्यात आली. ग्रामपंचायत आंबे पिंपरवाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत नागरिकांच्या हाताला काम मिळाले आहे.
यावेळी सरपंच मुकुंद घोडे व ग्राम रोजगार सेवक संदीप शेळकंदे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.