आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात भाविकांची सफला एकादशी निमित्त श्रींचे दर्शनास गर्दी झाली होती. आळंदी सफला एकादशी निमित्त वारकरी भाविकांनी दिंड्या दिंड्यातून हरिनाम गजरात पायी नगर प्रदक्षिणा केल्या. (Alandi)
या मध्ये एक श्वान देखील मोठ्या रुबाबात एका दिंडीच्या पुढे हरीनाम गजर सुरू असताना पुढे चालत होता. माऊली मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट सफला एकादशी निमित्त भाविकांची दर्शनासाठी हरिनाम गजरात गर्दी. मंदिर व नगरप्रदक्षिणा करीत भाविकांनी एकादशी साजरी केली.
परंपरेने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, पवमान पूजा, आरती, महानैवेद्य झाला. एकादशी निमित्त होणारे परंपरेचे कार्यक्रम देखील हरिनाम नजरात झाले. यावेळी जास्तीत जास्त भाविकांना कमीत कमी वेळेत सुखकर दर्शन देण्याची नियोजन व्यवस्थापक माऊली वीर यांनी केले. मंदिरात प्रसाद वाटप परंपरेने झाला. (Alandi)
भाविकांनी दिंडी, दिंडीतून नगरप्रदक्षिणा केल्या. व्यवस्थापक माऊली वीर यांनी नियोजन केले.
हे ही वाचा :
मोठी बातमी : विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता
मोठी बातमी : लाडक्या बहीणींच्या खात्यात आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता
इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!!
प्रसिद्ध चित्रपटनिर्माते श्याम बेनेगल यांचे ९० व्या वर्षी निधन
प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण