श्रींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ (Alandi)
आळंदी / अर्जुन मेदनकर : श्रीक्षेत्र पंढरपूर येथील पांडुरंगरायांच्या पालखी सोहळ्याचे वडमुखवाडीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट च्या वतीने मंदिरात रांगोळीच्या पायघड्या, पुष्पसजावटीसह हरिनाम गजरात सोहळ्याचे परतीचे प्रवासात जल्लोषात स्वागत करण्यात आले. (Alandi)
श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांनी पालखी सोहळ्याचे परंपरेने स्वागत केले.
याप्रसंगी श्री पांडुरंगराय पालखी सोहळा प्रमुख अधिपती ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर, श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्त ह.भ.प. माउली महाराज जळगावकर देशमुख, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त अँड राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मालक ह.भ.प बाळासाहेब आरफळकर, ऋषीआबा महाराज वासकर, उद्योजक पुनीत बालन, राहुल महाराज शिंदे या मान्यवरांचे शाल, श्रीफळ, उपरणे देवून श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रथा परंपरांचे पालन करीत अनेक वर्षां पासून श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरे समितीच्या वतीने पंढरपूर आळंदी पांडुरंगरायांच्या पादुका पालखी सोहळ्यातून आळंदी कार्तिकी एकादशी सोहळ्या अंतर्गत माउलींच्या भेटीला येतात.
आळंदी ते पंढरपूर पायी वारी पादुका पालखी सोहळा उरकून परतीचा प्रवास पादुका पालखी सोहळ्याने हरिनाम गजरात सुरू केला. अनेक वर्षां पासून पहिला मुक्काम श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात होत आहे.
यावेळी ट्रस्टच्या वतीने उपस्थित मान्यवराचे स्वागत व सत्कार तसेच सोहळ्याचा पाहुणचार मंदिरात करण्यात आला. यानिमित्त अनेक भाविक वारकरी दिंडेकरी, टाळकरी, विणेकरी पालखी मुक्कामी येथे विसावले होते.
यावेळी परिसरातील नागरिक, भाविकांनी पादुकांचे दर्शनास मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी पांडुरंगरायांच्या पालखी सोहळ्यातील वैभवी पादुकांची पूजा करून पादुकाना पुष्पहार, तुळशीहार, श्रीफळ अर्पण करण्यात आले. श्रींची आरती हरिनाम गजरात झाली.
श्रीना महानेवैद्य वाढविण्यात आला. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे खजिनदार दत्तात्रय गायकवाड, पै. किसनराव लांडगे, काशिनाथ तापकीर, मनोहर भोसले, रमेश घोंगडे महाराज, माऊली गुळुंजकर आदी मान्यवर उपस्थित होते. भाविक राजेंद्र नाणेकर यांचे वतीने मंदिरास लक्षवेधी पुष्प सजावट सेवा रुजू करण्यात आली. मंदिर परिसरात रोहिणी परतगुल्ले यांनी लक्षवेधी रांगोळी काढत भाविकांचे लक्ष वेधले. भाविक व वारकरी यांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.
हे ही वाचा :
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधीची जोरदार तयारी
गिनी मध्ये फुटबॉल मैदानावर दंगल, 100 ठार
डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी, डॉलर बदलण्याचा विचार सोडा…
NFR : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत 5647 जागांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 जागांसाठी भरती
जुन्नर : श्रेयश कदमची राष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धसाठी निवड