Monday, September 16, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी शपथ घेताच आळंदीत जय श्री राम...

ALANDI : पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी शपथ घेताच आळंदीत जय श्री राम जल्लोष

आळंदी / अर्जुन मेदनकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच आळंदीत महायुती आणि भाजपचे वतीने जय श्रीरामचा जयघोष जल्लोष करण्यात आला. ALANDI

यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी फटाक्याची आतषबाजी, भंडार्याची उधळण, उंटावरून साखर वाटप करीत माऊली मंदिरासमोर तसेच महाद्वारात एकच जल्लोष करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवडीचे स्वागत करीत एनडीए सरकार स्थापनेचे बॅण्डबाजाचे दणदणाटात जल्लोष केला.

यावेळी माऊली मंदिर समोरील महाद्वार प्रांगणात कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. त्याचे थेट प्रक्षेपण करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांना दिलेली शपथ सोहळा पाहत आनंद व्यक्त करीत जल्लोष केला.

या प्रसंगी भाजपचे केंद्रीय समितीचे विशेष निमंत्रक डॉ. राम गावडे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, किसान मोर्चाचे प्रमुख संजय घुंडरे, आळंदी शहर भाजपचे शहराध्यक्षा किरण येळवंडे, महायुती घटक पक्षाचे शहराध्यक्ष राहुल चव्हाण, रोहिदास कदम, बंडू नाना काळे, गणेश गरुड, आकाश जोशी, नितीन ननावरे, चारुदत्त प्रसादे, ज्ञानेश्वर बनसोडे, विभाग प्रमुख अमोल वीरकर, ज्ञानेश्वर घुंडरे, संगीता फफाळ, मंगला हुंडारे, संकेत वाघमारे, विशाल येळवंडे, शंतनू पोफळे, स्वामी संपत बवले, प्रीतम किर्वे, आनंद वडगावकर आदींसह युवक तरुण भाजपचे कार्यकर्ते यांनी मोठा जल्लोष केला.

खडी साखर उंटावरून तसेच महाद्वारात केंद्रीय समिती समितीचे विशेष निमंत्रित डॉ. राम गावडे यांचे नियंत्रणात पदाधिकारी यांनी भाविक, नागरिकांना साखर वाटून झेंडा फिरवत आनंद व्यक्त केला. ALANDI

कार्यकर्त्यांनी मिरवणुकीने आळंदीत जल्लोष करीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. पुन्हा मिरवणूक माऊली मंदिर मार्गे नगरप्रदक्षिणा मार्गावरून पुढे मार्गस्थ झाली.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात

ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती

मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ११ जून दरम्यान हाय अलर्ट

कंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिलेला प्रसिद्ध गायकाकडून नोकरीची ऑफर

मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात

ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब

मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !

ब्रेकिंग : निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक (PA) यांच्यावर प्राण घातक हल्ला, १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

संबंधित लेख

लोकप्रिय