Sunday, May 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडरुग्णालयांच्या दरवाढी विरोधात पिंपरीत आंदोलन

रुग्णालयांच्या दरवाढी विरोधात पिंपरीत आंदोलन

पिंपरी चिंचवड : शासकीय रुग्णालयाच्या धर्तीवर मनपाच्या सर्व रुग्णालयात वैद्यकीय उपचार व सुविधा करीता केलेली वाढीव दरवाढ तातडीने मागे घेणेकामी व मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा सुरु होऊन महिना उलटून गेला तरी शालेय साहित्य वाटप करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरले असून विद्यार्थ्यांना विनाविलंब शालेय साहित्य वाटप करण्याविषयी महानगरपालिका प्रशासक यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रवेशद्वार, पिंपरी याठिकाणी नागरी समस्या निवारण समिती व शहरातील समविचारी राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांच्या वतीने प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान बोलताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले की, प्रशासक राजेश पाटील यांनी केलेली रुग्णालयातील दरवाढ मागे घ्यावी व रखडलेले शालेय साहित्य तातडीने वाटप करावे.

तर स्वराज्य इंडियाचे मानव कांबळे म्हणाले, येत्या १ ऑगस्ट पासून रुग्णालयीन दरवाढ लागू केली तर २ ऑगस्ट रोजी मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय संत तुकाराम नगर याठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिला. आंदोलनात बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम यांनी आयुक्तांनी केलेल्या दरवाढीचा फेरविचार करावा अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारले जाईल असे मत व्यक्त केले

तर माजी नगरसेवक व समिती समन्वयक मारुती भापकर यांनी प्रशासक यांनी लोकनियुक्त सभागृह नसताना अशाप्रकारचा अन्यायकारक निर्णय जनतेवर लादू नये, अशी भूमिका मांडली.

या आंदोलनात माजी नगरसेवक संजय वाबळे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा छाया देसले, वर्षा जगताप, वेलफेअर पार्टीचे सालारभाई शेख, एमआयएमचे धम्मराज साळवे, प्रकाश जाधव, प्रदिप पवार, काशिनाथ नखाते, सुरेश गायकवाड, सतिश काळे , प्रविण कदम, नीरज कडू, सुनिता शिंदे, युवराज पवार उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय