Thursday, May 2, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडजाहिरातबाज सरकारच्या असंवेदनशीलतेने शितल गादेकर यांचा बळी गेला - काशिनाथ...

जाहिरातबाज सरकारच्या असंवेदनशीलतेने शितल गादेकर यांचा बळी गेला – काशिनाथ नखाते

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.३० – विविध मागण्यांना घेऊन अनेक वेळा पाठपुरावा केला, मात्र कोठेच दिलासा मिळत नाही हेलपाटे मारून आपल्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही म्हणून मुंबईच्या संगीता ढवरे व धुळ्याच्या शितल गादेकर या दोन महिला भगिनींनी सोमवारी मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न हे सरकारी व्यवस्थेचे अपयश आहे. यात शितल गादेकर यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला तर डवरे अत्यवस्थ आहेत सरकार जाहिरातीमध्ये आणि सभा घेण्यात गुंतलेल आहे त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्नावर संवेदना नाहीत त्यांच्या असंवेदनशीलतेने गादेकर ताईचा मृत्यू झाल्या असा आरोप कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केला.

महाराष्ट्र राज्यामध्ये शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर केवळ जाहिरात केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ तर्फे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की राज्यातील अनेक प्रश्नांना फाटा दिला जातो त्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत मुंबईतील पोलीस कॉन्स्टेबल यांचा काही दिवसांपूर्वी अपघातात ते जखमी झाले डॉक्टरांच्या चुकामुळे, त्यांच्या पतिवर योग्य उपचार न झाल्याने पाय निकामी झाला त्या दोषींवर कारवाईची मागणी त्या करीत होत्या पोलिसांच्या पत्नीला न्याय मागण्यासाठी आत्महत्याचां प्रयत्न करावा लागते हि दुर्दैवी गोष्ट आहे.

.तसेच पतीच्या निधनानंतर धुळे येथील शितल गादेकर यांच्या पतीच्या मित्राने जमीन बळकावले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून होत होती मात्र त्यांना गांभीर्याने घेतले गेले नाही . निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान च्या वर्तमान पत्रात मोठ्या जाहिरातीमधून झळकत असताना महाराष्ट्र राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, घरगुती वीज वापरकर्ते, यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे लागेल अन्यथा महाराष्ट्रातील जनता यापुढे फार मोठे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही नखाते यांनी यावेळी दिला आहे .

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय