Friday, March 29, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडचिखली व संभाजीनगर परिसरात विविध ठिकाणी राम जन्मोत्सव

चिखली व संभाजीनगर परिसरात विविध ठिकाणी राम जन्मोत्सव

पिंपरी चिंचवड/विविध धार्मिक कार्यक्रमांनी चिखली,संभाजीनगर परिसरात राजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
चिखलीतील प्राचीन राममंदीर येथील आज झालेल्या राम जन्मोत्सवानिमित्त
निघालेल्या भव्य मिरवणुकीत शेकडो भक्त सहभागी झाले होते.विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने शोभायात्रेत सामील झाला होता.
यात्रेचा समारोप शरदनगर येथील श्री हनुमान मंदिरात हभ.प गणेश महाराज जगताप यांच्या रामजन्मोत्सव किर्तनानंतर श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तसेच या ठिकाणी श्री हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवाची तयारी जोरदार चालू आहे.
वीर हनुमान देवस्थान ट्रस्ट व स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

संभाजीनगर परिसरातील श्री साई मंदिरात श्रीराम जन्मोत्सव भक्तिभावाने आणि जल्लोषात उत्साहात साजरा झाला रामभक्त हनुमान की जय सियावर रामचंद्र की जय च्या घोषणांनी मंदिर परिसर गजबजून गेला होता. गुढीपाडवा आणि रामजन्मोत्सवाचा ही माहोल आणि उत्साह यंदा सर्वत्र दिसून आला. जन्मोत्सवानिमित्त विविध मंदिरे आणि सामाजिक संस्थेच्या वतीने भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात आले सर्वात मंदिरात भव्य महाप्रसादाचा जंगी कार्यक्रम हे या उत्सवाचे वैशिष्ट्य होते.

संभाजीनगर चिखली परिसरातील सर्वच मंदिरांमध्ये सकाळी भजनांच्या साथीने श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला त्यानंतर अभिषेक पूजा श्री सत्यनारायणाची पुजा महाआरती आधी कार्यक्रम होऊन दुपारी सर्वच मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वात मंदिरात भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली होती.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय