Saturday, May 11, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडवाढीव वीजदर रद्द करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे चिंचवड येथे आंदोलन

वाढीव वीजदर रद्द करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे चिंचवड येथे आंदोलन

पिंपरी चिंचवड : दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कंपन्यानी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टीने चाफेकर चौक, चिंचवड येथे आप ने आंदोलन करून दरवाढ तातडीने मागे घ्या, या मागणीची निवेदन जिल्हाधिकारी / तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

विद्यमान ३० टक्के दरवाढ मागे घ्या. भाजप सेना युतीने निवडणूक २०१९ जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे, तसेच ३०० युनिटपर्यंतची घरगुती मोफत वीज देण्याचे आश्वासन पूर्ण करा. या प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आपचे अध्यक्ष रंगा राचुरे यांनी पाठवले आहे.

ते म्हणाले, दिल्लीच्या केजरीवाल सरकार २०० युनिट घरगुती वीज मोफत देत आहे. तरी सुद्धा विद्युत मंडळ फायद्यात आहे. पंजाब सरकार ३०० युनिट वीज मोफत देणार आहे. महाराष्ट्रात सरकार १२ ते १८ रु प्रती युनिट दर लावून सरकार सावकारासारखे लुटत आहे. आघाडी सरकारच्या महागड्या विजेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलने केली आहेत. आता भाजप सेना युती सरकारने ही वीजदर वाढ मागे घ्यावी असे रंगा राचुरे यांनी आवाहन केले आहे.

आप पिंपरी चिंचवड कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली ज्योती शिंदे, स्मिता पवार, महेश गायकवाड, वहाब शेख, प्रकाश हगवणे, संतोषी नायर, स्वप्निल जेवळे, विजय अब्बाड, गोविद माळी, सरोज कदम, राज चाकणे, ब्रह्मानंद जाधव, मीना जावळे,आशितोष शेळके, यशवंत कांबळे, वैजनाथ शिरसाठ, अशोक तनपुरे, आदिनाथ सकट, संतोष गायकवाड, अजित सिह, चंद्रकांत हुंबरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय