Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआला नंदीबैल ....सांग सांग भोलानाथ.... डिजिटल पेमेंट स्वीकारणार का?

आला नंदीबैल ….सांग सांग भोलानाथ…. डिजिटल पेमेंट स्वीकारणार का?

डिजिटल पेमेंटची अजब कल्पना, कॅशलेस नंदीबैल

इंटरनेट
: नंदीबैलाचे खेळ करणे व भविष्य सांगणे हा एक पारंपरिक भटक्या जमातीचा व्यवसाय आहे. जे काही दान मिळेल त्यावर उदरनिर्वाह करणारे नंदीबैलवाले शहरात येतात. तसेच सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय अशा बडबडगीतामधूनच आपलं लहानपण गेलं आहे. आता आधुनिक जगात भोलेनाथाचे वाहन असणाऱ्या नंदीबैलाच्या गळ्यामध्ये घंटी नसून एक क्यू आर कोड आहे.



असाच एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डिजिटल पेमेंटची वाढती लोकप्रियता या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहे. एका घरासमोर देणगी देण्यासाठी एक व्यक्ती नंदी बैलाच्या कपाळावरील UPI बारकोड स्कॅन करत आहे.

डिजिटल पेमेंटच्या या दुनियेत अजब, अभिनव संकल्पनेद्वारे दान स्वीकारणाऱ्या या नंदीबैलवल्याचे लोक खूप कौतुक करत आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय