Home पुणे - पिंपरी चिंचवड Ambegaon : आदिवासी ठाकर समाजाच्या प्रश्नांवरील संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन

Ambegaon : आदिवासी ठाकर समाजाच्या प्रश्नांवरील संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन

A study report booklet on the social and economic status of the Thakar community in Ambegaon taluka has been published

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर आधारित अभ्यास अहवाल पुस्तिकेचे नुकतेच प्रकाशन झाले. आदिम संस्कृती अभ्यास संशोधन व मानव विकास केंद्राच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील १३ गावांतील ठाकर वस्त्यांचा २०२२ मध्ये अभ्यास करण्यात आलेला होता. या संशोधन अहवाल पुस्तिकेचा प्रकाशन कार्यक्रम चास येथील वडाचीवाडी – ठाकरवाडीत पार पडला. आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी मा. प्रदिप देसाई यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. (Ambegaon)

या अहवालातून आदिवासी ठाकर जमातीच्या एकूण कुटुंब संख्येपैकी ५४.४ टक्के कुटुंबांच्या घराखालील जमीन त्यांच्या नावे नाही, तर उच्च शिक्षणाचे प्रमाण फक्त ४ टक्के आहे. ७५ टक्के लोकं हे उपजीविकेसाठी शेतमजुरीवर अवलंबून आहेत. आदि प्रमुख मुद्दे समोर आले आहेत . या अहवालात आंबेगाव तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजाची शैक्षणिक, आर्थिक, आरोग्यविषयक तसेच सामाजिक परिस्थितीवर सखोल माहिती देण्यात आली आहे.  या अभ्यास अहवालाचे लेखन किरण लोहकरे व प्रा. स्नेहल साबळे यांनी केले आहे.

यावेळी बोलताना प्रकल्प अधिकारी  म्हणाले, कि ‘या अभ्यासातून आदिवासी ठाकर समाजाच्या समस्यांचे मूळ समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करता येतील. विशेषतः शिक्षण आणि रोजगार यावर लक्ष केंद्रीत करून प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आम्ही आवश्यक ते सर्व प्रयत्न या जमातीच्या विकासासाठी करू. तसेच उपलब्ध शासकीय  योजनांचा लाभ आदिवासी ठाकर समाजाला कसा मिळेल यासाठी मी स्वत : प्रयत्नशील राहील.’

यावेळी बोलताना आदिम संस्थेचे राजू घोडे यांनी सांगितले की, ‘हा अहवाल आदिवासी ठाकर समाजाच्या विकासासाठी दिशादर्शक ठरेल. समाजातील मुलभूत गरजा आणि अडचणी लक्षात घेऊन विकास आराखडे तयार करणे आवश्यक आहे.’ यावेळी या संशोधनातून समोर आलेल्या ठाकर जमातीच्या प्रमुख प्रश्नांवर प्रा. युवराज काळे यांनी मांडणी केली. ही अहवाल पुस्तिका आदिवासी ठाकर समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास प्रा.युवराज काळे यांनी व्यक्त करण्यात आला. (Ambegaon)

पुस्तिका प्रकाशनानंतर उपस्थित मान्यवरांनी आदिवासी ठाकर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या अभ्यास अहवालाचा उपयोग करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे आयोजन आदिम संस्कृती अभ्यास संशोधन व मानव विकास केंद्र आंबेगाव या संस्था यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर गारे, प्रास्ताविक प्रा.युवराज काळे तर आभार अर्जुन काळे यांनी मांडले.

यावेळी आदिम संस्थेच्या व्यवस्थापक प्रा.स्नेहल साबळे, सहाय्यक व्यवस्थापक व प्रकल्प समन्वयक समीर गारे, दिपाली वालकोळी, ठाकरवाडी गावचे पोलीस पाटील वैभव शेगर, ग्रामपंचायत सदस्य मनिषा बारवे, सुभाष पारधी, पायल काळे, प्रकाश काळे, राजाराम  जाधव, सोनाबाई केवाळे, अमोल केवाळे, विजय काळे, अनिल काळे प्रताप पारधी, शेवंता पारधी आदी उपस्थित होते.

Ambegaon

हे ही वाचा :

सर्वात मोठी भरती : भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 13,735 जागांसाठी मेगा भरती

जुन्नर बस स्थानकात पिकअप वाहनाचे धोकादायक स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात

मोठी बातमी : प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन

मोठी बातमी : 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी

धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप

परभणीतील हिंसाचारानंतर आंबेडकरवादी उच्च शिक्षित तरूणाचा पोलिस कोठडीत मृत्यू, सर्वत्र खळबळ

ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी

Exit mobile version