आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई मराठ्यांसह मागासवर्गीस समाज बांधव पुर्ण ताकतीने लढणार – सुनिल धायजे
बीड : गोरगरीब, मोलमजुरी करणाऱ्या मराठा व इतर समाज बांधवाप्रति शुद्ध हेतू असलेल्या आणि आरक्षणापासून वंचित असलेल्या मराठा समाजातील मुला-मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष, आ.विनायक मेटे गेल्या 30 वर्षापासून लढा देत आहेत.
मराठा समाजाला अनेक वर्षाच्या संघर्षानंतर मिळालेलं आरक्षण रद्द झाल्यानंतर संपूर्ण मराठा समाज बांधवामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. यात प्रामुख्याने मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षापासून संघर्ष करणारे व गोरगरीब, वाडी वस्तीवर राहणाऱ्या मराठा बांधवांच्या आडी-अडचणीची जान असणारे आ.विनायक मेटे यांनी राज्य सरकारला वारंवार जागं करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सरकारच्या दिरंगाईचा फटका मोठ्याप्रमाणात मराठा समाजाला बसला आहे.
म्हणून या निर्णया विरोधात सतत लढा देणारे आ.विनायक मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड येथे दिनांक 05 जून ला मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले असून छ.शिवाजी महाराज क्रिडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालय, बीड असा मार्चाचा मार्ग असणार आहे.
मराठा आरक्षण प्रश्नी तमाम मुला-मुलींचे भविष्य या सरकारमुळे अंधकारमय झाले आहे. ते उजळविण्याचे काम आता मराठ्यांसोबत मागासवर्गीय समाज करणार आहे. मराठा समाजासोबत इतर अठरापगड जातीसह मागासवर्गीय समाजबांधव देखील मोठ्यासंख्येने सहभागी होणार असून, पुढच्या पिढीसाठी रस्त्यावरची लढाई मराठ्यासोबत मागासवर्गीय बांधव एकजुटीने लढणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे नेते सुनिल धायजे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.