Monday, January 13, 2025
HomeNewsपुणे : जुन्नर तालुक्यात दोन बालविवाह रोखले, प्रशासनाची धडक कारवाई !

पुणे : जुन्नर तालुक्यात दोन बालविवाह रोखले, प्रशासनाची धडक कारवाई !

जुन्नर (पुणे)  : जुन्नर तालुक्यातील निमगिरी व बेल्हे येथे महिला बालविकास विभागाचे अधिकारी यांच्या सतर्कतेने दोन बालविवाह रोखण्यात आले. तसेच संबंधितांना दहा हजारांचा दंड करण्यात आला. 

लॉकडाऊन काळात बालविवाह वाढले आहेत. परंतु प्रशासनापर्यंत याबाबत माहिती जात नाही. परंतु तालुक्यातील दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. 

निमगिरी येथे लग्नघरी आदल्यादिवशी वाजत गाजत साखरपुडा, टिळा, हळदी समारंभ झाले होते. दुसऱ्या दिवशी वधुवरांच्या डोक्यावर अक्षता पडणे बाकी असतानाच पोलीस व महिला बालविकास विभागाचे अधिकारी लग्नघरी आल्याने पाहुणे, आप्तेष्टांची धावपळ उडाली. वधूचे वय १७ वर्षं असल्याने हा बालविवाह यावेळी प्रशासनाकडून रोखण्यात आला.


संबंधित लेख

लोकप्रिय