अयोध्या : अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्र भवन उभारणार, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath Shinde) केली. उत्तर भारतीय आणि महाराष्ट्र काही वेगळा नाही, असं विधानही त्यांनी केलं. याआधी देखील एका कार्यक्रमात बोलताना उत्तर प्रदेशातील अयोध्येत लवकरच महाराष्ट्र भवन बांधले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
एकनाथ शिंदे म्हणाले की, “शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर उभारण्याचे स्वप्न होते, जे पंतप्रधान मोदींनी पवित्र भूमीवर मंदिराचे बांधकाम सुरू करून पूर्ण केले. संपूर्ण वातावरण भगवेमय झालं आहे. राममय झाले आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“आज राममंदिराच्या उभारणीचे कामही पाहिले. सगळ्यांना वाटायचं की राम मंदिर कसं बांधणार? लोक म्हणायचे ‘मंदिर वहीं बनाएंगे, लेकिन तारीख नहीं बताएंगे? पण पीएम मोदींनी ते करून दाखवलं आणि तारीखही सांगितली. जे शंका उपस्थित करत होते, त्यांना घरी बसवलं आहे”, अशी टीका देखील मुख्यमंत्री शिंदेंनी केली.