Shirur Loksabha 2024 : शिरुर लोकसभा मतदारसंघात (Shirur Loksabha) महायुतीला मोठा झटका बसला आहे. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते अतुल देशमुख यांनी भाजपला रामराम केला होता. गुरुवारी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. देशमुख यांनी रविवारी भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे देशमुख यांनी आपला राजीनामा पाठविला होता.
भाजपाने विकासाबाबत विश्वासात घेतले नाही. ज्या पक्षात काम करतो तेच आपला विचार करत नसल्याची खंत व्यक्त करत भाजपाला सोडण्याचे जाहीर करत देशमुख यांनी राजीनामा दिला होता.
डॉ. अमोल कोल्हे यांचे पारडे जड !
अतुल देशमुख यांनी तुतारी हाती घेतल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पारडे जड ठरणार असल्याची चर्चा आहे. भाजप आणि मित्रपक्षात अंतर्गत नाराजीचा सूर कायम असल्याचे बोलले जात आहे. अशाच अतुल देशमुख यांनी महायुतीला मोठा झटका दिला आहे.


हे ही वाचा :
मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर
प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल
जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या
ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू
माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत
हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना
मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !
ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू