Monday, December 23, 2024
Homeआंबेगावबाळाचे पहिले १००० दिवस मोलाचे – बालविकास प्रकल्प अधिकारी प्रितम बारभुवन 

बाळाचे पहिले १००० दिवस मोलाचे – बालविकास प्रकल्प अधिकारी प्रितम बारभुवन 

घोडेगाव : एकात्मिक बालविकास प्रकल्प व आरोग्य विभाग, घोडेगाव, मुकूल माधव फाऊंडेशन व साथी संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सक्षम लोकसहभागातून कुपोषण मुक्त गाव अभियान’ आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात सुरू असून या प्रक्रियेतील अंगणवाडी सेविका व गाव कार्यकर्ती यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी प्रितम बारभुवन यांनी घोडेगाव येथे केले. A baby’s first 1000 days are precious – Child Development Project Officer Pritam Barbhuvan

या प्रसंगी १००० दिवसांचे महत्व अधोरेखित करीत त्यांनी माता व बालकांच्या पोषणाचे महत्व अंगणवाडी सेविका व पोषण कार्यकर्त्यांना पटवून दिले. 

साथी संस्थेचे शैलेश डिखळे व स्वप्निल व्यवहारे यांनी ‘पोषणाचे महत्व, बालकाचे सुरूवातीचे १००० दिवस, कुपोषणाची कारणे व उपाय तसेच गरोदर व स्तनदा मातांचे पोषण’ आदी संदर्भात प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले.

लोक सहभागाने सुरू केलेल्या या मोहिमेत आदिवासी पट्ट्यातील अंगणवाडी सेविका व पोषण सहेलींना “पोषण प्रशिक्षण” देण्यात आले. कुपोषणाशी जोडलेल्या आहार व आरोग्य विषयक पैलूंवर कार्यशाळेत चर्चा घडवली गेली. कार्यशाळेचे सूत्र संचालन राजू घोडे यांनी केले. रुपाली डामसे यांनी आभार मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय