Junnar : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्राच्या वतीने धुणी-भांडी व मजूर कामगार यांची ऑनलाईन नाव नोंदणी सुरूवात करण्यात आली आहे. या नाव नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी 640 कामगारांची नोंदणी केल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी दिली. (Junnar)
संघटनेच्या वतीने अध्यक्ष अरूण शेरकर व महिला अध्यक्षा नफिसा इनामदार याच्या मार्गदर्शनाखाली घुणी-भांडी व मजूर कामगार संघटीत करून त्यांना त्यांच्या हक्क मिळवून देण्यासाठी नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे. कामगारांनी नाव नोंदणी करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाव नोंदणीसाठी घुणी-भांडी व मजूर कामगारांचे वय 18 वर्ष पेक्षा अधिक असावे. वाढपी, आचारी, साफसफाई, घुणी-भांडी करणारे, खाजगी दवाखाने, दुकान, हाॅल, हॉटेल, धार्मिक स्थळे इत्यादी साफसफाई करणारे कामगार यांनी नाव नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
घुणीभांडी व मजूर कामगार म्हणून ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता ज्या ठिकाणी कामगार काम करत आहे, अशा घरमालक किंवा संस्थेने आमच्या येथे काम करतो, म्हणून दाखला द्यावा लागतो. मात्र, असा दाखला दिला जात नाही. यामुळे चव्हाण यांनी संस्थेच्या वतीने जबाबदारी घेवून धुणीभांडी व मजूर कामगार यांना दाखला देऊन सहकार्य केले आहे.
यासाठी लोकसेवा केंद्राचे मिलिंद खरात याची ऑनलाईन नोंदणीसाठी मदत झाली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राहुल मुसळे, सुनिल जंगम, चंद्रकला पोपळघट, संस्थेचे मार्गदर्शक नरसिंग कलोसिया, महिला उपाध्यक्षा रजनी शहा, सचिव शमिम सय्यद, गायत्री गिरी, मंगेश साळवे, अश्विनी साळवे, गोरक्ष नरवीर उपस्थित होते.
हे ही वाचा :
जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अॅट्रॉसिटी दाखल
मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी
महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार
मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!
Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल
CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती
मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक
अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका
वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला