Nevasa : मांजराला वाचवण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नेवासा (Nevasa) तालुक्यातील वाकडी या गावात एका हृदयद्रावक घटनेत मांजराला वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मांजरीला वाचवण्यासाठी बायोगॅसच्या (Biogas) खड्ड्यामध्ये पडल्याने गुदमरुन मृत्यू झाला आहे.
नेवासा तालुक्यातील (Nevasa) वाकडी या गावात गुढीपाडव्याच्या संध्याकाळी सुमारास खोल असलेल्या बायोगॅसच्या शोष खड्ड्यात मांजर पडलं तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एकजण मांजरीला बाहेर काढण्यासाठी बायोगॅसच्या खड्ड्यात उतरला होता. हा खड्डा पूर्णपणे शेणाने भरला होता. मांजरीला वाचवताना हा व्यक्ती खड्ड्यात पडला. त्यांना वाचवण्यासाठी एका मागून एक असे ४ जण बायोगॅसच्या खड्ड्यात पडले.
सर्व मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे, बाबासाहेब गायकवाड अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी या विहिरीजवळ धाव घेतली मात्र शोष खड्ड्यात शेणाचं प्रमाण जास्त असल्याने अडथळे येत होते. परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने एकाला लवकर बाहेर काढण्यात आलं मात्र इतर पाच जणांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा :
मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !
ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात ; ५० फूट खोल दरीत बस कोसळली, १४ जणांचा मृत्यू
मोठी बातमी : भाजपला पाठिंबा देताच राज ठाकरेंना मोठा धक्का
मोठी बातमी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी घोषणा
मोठी बातमी : अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा झटका
काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
मोठी बातमी : महाविकास आघाडीची पत्रकार परिषद, वाचा कोणत्या पक्षाला किती जागा !
भाजपच्या बड्या नेत्याने घेतली सलमान खानची भेट, राजकिय वर्तूळात जोरदार चर्चा