पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : ह भ प नारायण केरबा मुंडे यांच्या ७ व्या पुण्यस्मरणानिमीत्त आयोजित संगीतमय श्रीमद भागवत कथा सप्ताहाची सांगता होऊन ह भ प तुषार महाराज दळवी यांच्या काल्याचे कीर्तन मोठ्या धार्मिक आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाले. PCMC NEWS
“जीव रुपी सर्प आहे, त्याचावर गरुड रुपी काळ आरूढ झालेला आहे, यातून वाचायचे असेल तर मनुष्याने भागवत रुपी कथेत स्नान करावे, मग त्या जीवाला भगवंताच्या कचेरीत येत असतो, तेथून तो जीव काळावर स्वार होतो, मग हा जीव भगवंताच्या कामाला लागत असतो.” असे मौलिक वर्णन भागवताचार्य हभप केशव महाराज शास्त्री यांनी केले.
“भागवत कथेच्या श्रवणाने जीवनातील व्यथा नष्ट होत असतात, भागवत कथा पितृदोष निवरण्याचे कार्य करत असते, म्हणून या कथेला कथाअमृत म्हणतात” असे उद्धबोधन करीत ग्रंथ दिंडी, श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोवर्धन लीला, रुक्मिणी स्वयंवर, व सुदामा चरित्र याचे सादरीकरण महंत केशव महाराज शास्त्री यांनी केले.
समाज सेवा हाच धर्म या उक्तीने ह भ प सुनंदाताई मुंडे व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमद् भागवत कथेचे आयोजन केले होते.
स्व. नारायण केरबा मुंडे पुण्यस्मरण निमीत्त असे धार्मिक आणि सामाजिक कार्य नियमित सुरू ठेवावे, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत असे कार्यक्रम घेतले जातील अशी ग्वाही ज्ञानेश्वर व किशोर मुंडे बंधूनी दिली.
श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन दरम्यान महात्मा फुलेनगर, चिंचवड व शहरातील (PCMC) भाविक विशेषतः महिला वर्ग उपस्थित होता, त्याचप्रमाणे महंत केशव महाराज शास्त्री यांनी कथामृत दिले.
सप्ताहाला भेटी देणारे संत महंत, टाळकरी, गायक, वादक, स्टेज, मंडप, साउंड आदीसह ज्ञान- अज्ञात, प्रसार माध्यमे, विशेष करून मुंडे परिवारासोबत हा सोहळा यशस्वी करणाऱ्याचे हजारो लोकसमूहाचा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान हा मनस्वी आभार व्यक्त करत असल्याचे शिवानंद चौगुले यांनी सांगितले.
हे ही वाचा :
भारतीय लोकशाहीला वाचविण्यासाठी भाजपा महायुतीला पराभूत करा; राजकीय राज्यस्तरीय परिषदेचे आवाहन