Rajgurunagar : जुन्नर तालुक्यातील नारायणगडाच्या पायथ्याशी राहत असलेल्या आदिवासी बांधवांनी वन विभागाच्या क्षेत्रात अतिक्रमण केल्याचे सांगत, त्यांची राहती घर, पिण्याच्या पाण्याची विहीरी जमिनी दोस्त करण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई वनविभागाने ८ मार्च रोजी नारायणगाव शेजारील नारायणगड या ठिकाणी केली. या कारवाई विरोधात आदिवासी समाजबांधव मंचर येथील प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलनासाठी बसले आहे. या आंदोलकांना न्याय देण्याच्या मागणीचे निवेदन बिरसा ब्रिगेड राजगुरूनगर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले. Rajgurunagar
बिरसा ब्रिगेडने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, वनहक्क समिती कायद्याप्रमाणे २००५ च्या अगोदर ज्या ठिकाणी राहणारा नागरिक हा वनहक्क समिती कायदयाने त्या ठिकाणी रहीवासी किंवा शेतजमिनीचा मालक आहे. परंतु वनहक्क कायदयानुसार त्या ठिकाणी वनहक्क दावा मिळावा. हा प्रश्न कोर्टात प्रलंबीत असताना वनहक्क समिती पुणे जिल्हा सचिव प्रकल्प कार्यालय घोडेगाव व अध्यक्ष जिल्हाअधिकारी आहेत, परंतु वनखात्याने पुणे जिल्हा वनहक्क समितीचे सचिव यांना विचारात न घेता अध्यक्ष यांच्या सहीने आदिवासी कुटुंब बेघर करून त्याठिकाणी विहीरी बुजवण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी एकुण १४५ कुटुंब वास्तव्यास आहेत. आज सुध्दा त्यांना ना घर ना पाणी मुलांना शाळा नाही. १३ मार्च पासुन प्रांत कार्यालय मंचर ता. आंबेगाव या ठिकाणी उपोषणास बसले आहेत. तरीही शासनाने अद्याप कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही. असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आदिवासी कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.
या वेळी बिरसा ब्रिगेड पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश गभाले, पुणे जिल्हा मातृ शक्ती प्रमुख उमाताई मते, बिरसा ब्रिगेड आंबेगाव तालुका अध्यक्ष आनंद मोहरे, खेड तालुका बिरसा ब्रिगेड अध्यक्ष संतोष सुपे, बिरसा ब्रिगेड कार्यकर्ते दत्ता चौधरी, तानाजी भोकटे, सरपंच खरपुड आदि कार्येकर्ते यावेळी उपस्थित होते.
हे ही वाचा :
Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर
ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव
ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार
ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड
बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस
Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !