Thursday, December 26, 2024
Homeताज्या बातम्याGaurav Bhatia: भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांना वकिलांकडून मारहाण, वाचा काय आहे...

Gaurav Bhatia: भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांना वकिलांकडून मारहाण, वाचा काय आहे प्रकरण !

Gaurav Bhatia : भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि वकील गौरव भाटिया (Gaurav Bhatia) यांच्याबाबत वकिलांकडून मारहान करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. देशभरात लोकसभा निवडणूकांच्या रणधूमाळीला सुरूवात झाली असतानाच भाजपच्या प्रवक्त्याला मारहाणीचे प्रकरण चर्चेचा विषय ठरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया (Gaurav Bhatia) हे ग्रेटर नोएडा शहरातील जिल्हा न्यायालयात गेले होते. ग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्ध नगर येथील जिल्हा न्यायालयात बुधवारी वकिलांचा संप होता. ग्रेटर नोएडा येथील न्यायालयात काम करणाऱ्या वकिलांनी काम बंद ठेवत हा संप आयोजित केला होता.

त्यावेळी गौरव भाटिया (Gaurav Bhatia) हे प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवचा (Elvis Yadav) जामीन घेण्यासाठी न्यायालयात गेले होते. कोर्टात उपस्थित वकिलांनी गौरव भाटीयास यांना सांगितले की, आज कोर्टात संप आहे, त्यामुळे तुम्ही कोर्टात हजर राहू नका आणि तुमचा वकिलांचा बँड काढून टाका. यावर गौरव भाटिया हजर राहण्यावर ठाम राहिला. गौरव भाटिया हे कोर्टात गेल्याने काही वेळातच तिथे गोंधळ निर्माण झाला.

न्यायालयात वकिलांच्या संपादरम्यान, यूट्यूब आणि प्रसिद्ध आरोपी एल्विस यादव याच्या जामीन अर्जाशी संबंधित प्रकरणाबाबत ग्रेटर नोएडा न्यायालयातील वकिलांनी प्रचंड संताप व्यक्त केला.

या गोंधळात भाजपच्या प्रवक्त्ये गौरव भाटिया यांना अन्य वकिलांकडून मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखले झाले. पोलिसांनी भाटीयांना सुरक्षितपणे त्यांच्या गाडी पर्यत सोडले. ग्रेटर नोएडा कोर्टातील हा प्रकार चर्चेचा एक विषय बनला आहे. या संदर्भातील वृत्त एका हिंदी माध्यमाने दिले आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर

ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव

ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड

बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस

Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !

संबंधित लेख

लोकप्रिय