पिंपरी चिंचवड/ क्रांतीकुमार कडुलकर : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजर्षी शाहू इंजिनिअरिंग कॉलेज ताथवडे शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इनोव्हिजनचे (दि. २०रोजी) स १० वा उदघाटन होणार आहे.
यंदा”विकसित भारत अभियान ” या संकल्पनेवर आधारित हा तांत्रिक महोत्सव आहे.
या महोत्सवाचे उदघाटन शेफलर इंडिया कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाचे उपाध्यक्ष शंतनू घोषाल यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.सुनील भिरूड, फॉक्सबेरी टेक्नॉलॉजीचे सीइओ अंकित भार्गव, वाघोली येथील जेएसपीएम युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ रवी जोशी, संचालक अनिल भोसले, डॉ पी.पी विटकर, ताथवडे शैक्षणिक संकूल संचालक प्रा सुधीर भिलारे, श्री रवी सावंत, शाहू कॉलेजचे संचालक डॉ राकेश जैन, उप संचालक डॉ.अविनाश देवस्थळी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
यावेळी राजर्षी शाहू अभियांत्रिकी कॉलेज, व्यवस्थापन, डिप्लोमा आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी २० /२१ मार्च 202४ रोजी इनोव्हिजन ‘या राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक-तांत्रिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. विद्यार्थी त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करू शकतात. या तांत्रिक कार्यक्रमात देशभरातील नामांकित महाविद्यालये आणि प्रतिष्ठित संस्थांमधील 10,000 हून अधिक अभियांत्रिकी, व्यवस्थापन, डिप्लोमा आणि फार्मसीचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.अशी माहिती इनोव्हीजनचे समन्वयक डॉ. नीहार रंजन यांनी दिली.