Wednesday, January 15, 2025
Homeताज्या बातम्याPCMC : चिखली कुदळवाडी येथील अनधिकृत पत्राशेडवर मनपाची मोठी कारवाई

PCMC : चिखली कुदळवाडी येथील अनधिकृत पत्राशेडवर मनपाची मोठी कारवाई

पिंपरी चिंचवड : क्रांतीकुमार कडुलकर : दि. २९ – पिंपरी ‍चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विशेष मोहिमेतंर्गत प्रभाग क्र. २ मधील कुदळवाडी, चिखली ३० मीटर डी.पी.रस्त्यामधील सुमारे ५० हजार चौरस फुट क्षेत्रातील ११ वीट बांधकामसह पत्राशेड इत्यादींवर अतिक्रमण निष्कासनाची आज कारवाई करण्यात आली व रस्ता रुंदीकरण करण्यात आले.

      पिंपरी ‍चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपआयुक्त मनोज लोणकर आणि कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टुवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी समक्ष स्थळपाहणी करुन कारवाईची माहिती घेतली व अधिकारी वर्गास सूचना दिल्या तसेच रस्त्याचे काम त्वरीत सुरु करण्याच्या सूचनाही स्थापत्य विभागास दिल्या.

क,ई,फ आणि ह क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे,राजेश आगळे,सिताराम बहुरे,उमेश ढाकणे तसेच कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे,उपअभियंता सुर्यकांत मोहिते,मनोज बोरसे,नरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता संदिप वैद्य,किरण सगर,इम्रान कलाल,क्षितीजा देशमुख,चंद्रकांत पाटील, प्रियंका म्हस्के,रचना दळवी,संदिप वाडीले तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ऎश्वर्या मासाळ,केशव खांडेकर,निकिता फ़डतरे,श्रीकांत फ़ाळके,स्मिता गव्हाणे व मनपा कर्मचारी,महाराष्ट्र सुरक्षा बल,महाराष्ट्र पोलिस,यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.

        दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे आणि यापुढेही ही कारवाई सुरू राहणार आहे,नागरिकांनी रस्त्यांवर बेवारस वाहने उभी करुन नयेत तसेच अनधिकृत टपऱ्या, पत्राशेड आणि बॅनर्स उभारु नये,फुटपाथ स्वच्छ  ठेवण्यासाठी सहकार्य करावे.आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशनानुसार सदर कारवाई केलेल्या ठिकाणी महापालिका प्रशासनाची परवानगी घेतल्याशिवाय पत्राशेड बांधकाम करु नये,असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.

संबंधित लेख

लोकप्रिय