Thursday, December 5, 2024
Homeराजकारणभारत चीन तणाव; पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

भारत चीन तणाव; पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

 (प्रतिनिधी):- भारत आणि चीन दरम्यान पूर्व लडाख जवळच्या सामी रेषेवर गेल्या महिन्याभरापासून संघर्ष सुरु आहे. दरम्यान, चीनी सैन्य आणि भारतीय सैन्यांमध्ये  झालेल्या झटापटीत २० जवान शहीद झाले आहेत तर चीनचे ४३ सैनिक ठार झाले आहेत. 

      याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, या संदर्भात मोदींनी ट्विट केले आहे की, भारत-चीन सीमा भागातील परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी  19 जून रोजी सायंकाळी पाच वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या आभासी बैठकीत विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष भाग घेतील. अशी माहिती पीएमओ कडून देण्यात आली आहे.

     भारत चीन मध्ये झालेल्या चकमकीत जवान शहीद झाल्या नंतर देशभरातून चीनचा बदला घेण्याची मागणी केली जात आहे. 

संबंधित लेख

लोकप्रिय