Thursday, December 5, 2024
HomeNewsPCMC:मानवी हक्क संरक्षण जागृतीच्या वतीने शिवजयंती आभिवादन करून साजरी

PCMC:मानवी हक्क संरक्षण जागृतीच्या वतीने शिवजयंती आभिवादन करून साजरी

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.१९-
राजे छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा करून करून पुष्पहार अर्पण करून महाराजांची 394 जयंती मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने करण्यात आली.

यावेळी जोगदंड यांनी उपस्थितांना सांगितले की महाराजाचा जन्म.19 फेफ्रुवारी 1630 शिवनेरीवर किल्ल्यावर झाला.1870 ला समाजसुधारक महात्मा फुले यांनी प्रथम शिवजयंती साजरी केलीपण 1895 मध्ये लोकमान्य टिळक यांनी उत्सव सुरू केला. शिवाजी महाराज उत्कृष्ट संघटन कौशल्य असणारे न्याय शिस्त प्रिय राजे होते अशी महाराजांची विषयी माहिती देण्यात आली. लांडेवाडीतील भव्य अशा स्मारकास आभिवादन करून शिवजयंती साजरी करण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, नितीन काळे, दीपक काळे, हनुमंत शेळके, प्रशांत पाटील, प्रकाश सावंत, सुनील धुमाळ राहुल वाघमारे,राहुल काकडे,इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय