Saturday, April 13, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : एल निनो मूळे यावर्षीही तापमान वाढ, दुष्काळ, पाणी टंचाईचा...

विशेष लेख : एल निनो मूळे यावर्षीही तापमान वाढ, दुष्काळ, पाणी टंचाईचा सामना करा.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामान बदलाचे परिणाम (Global warming) जगभर दिसू लागले आहेत. त्याच्या प्रभावामुळे यावर्षी फेब्रुवारीमध्ये विक्रमी उष्मा येण्याची शक्यता आहे. द गार्डियन या इंग्रजी वृत्तपत्राने आपल्या एका वृत्तात याचा उल्लेख केला आहे. एक विशेष हवामान घटना घडत आहे की, मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राचे तापमान (ocean temparature) सामान्यपेक्षा जास्त आहे, त्यामुळे जगभर हवामानाचे चक्र बदलले आहे. Global warming news

सोप्या भाषेत या परिणामामुळे तापमानात लक्षणीय वाढ होते. त्यामुळे पश्चिम पॅसिफिकमधील गरम पाणी विषुववृत्ताच्या बाजूने पूर्वेकडे सरकू लागले आहे.

यामुळे भारताच्या हवामानावर परिणाम होतोय. अशा परिस्थितीत दक्षिण आशिया प्रदेशाला भयंकर उष्णतेचा सामना करावा लागतो आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागते. भारत देखील याच प्रदेशात आहे, त्यामुळे एल निनोच्या प्रभावामुळे येथे उष्णता वाढते आहे.

गेल्या हंगामात ‘एल निनो’चा मान्सूनला फटका बसला. तसेच २०२३ हे दुसरे सर्वात उष्ण वर्ष ठरले. दरम्यान, आगामी मान्सून हंगामाबाबत आनंदाची बातमी आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ‘एल निनो’ परिस्थिती जून २०२४ पर्यंत संपुष्टात येण्याची अपेक्षा आहे.

कार्बन डाय ऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड या तीन वायूंचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आणि समुद्राच्या पातळीत दुप्पट वाढ झाल्याचे तसेच अंटार्टिक समुद्रातील बर्फाचे आच्छादन घटल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले आहे. कॅनडा आणि अमेरिकेतील उष्णतेची लाट व चिली मधील वणव्याच्या घटना तसेच पूर्व आफ्रिकेतील दुष्काळ आणि नंतरची पूरस्थिती हे तापमानवाढीचे परिणाम आहेत असेही अहवालात म्हटले आहे.

एल निनो हा नैसर्गिक खेळ असला तरी त्याचा आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो.त्याचे गांभीर्य जाणून घेणे गरजेचं आहे!

अल निनोचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्था आणि शेतीवर दिसून येईल. अनेक देशांमध्ये पीक उत्पादनावर नकारात्मक परिणाम दिसू शकतो. दक्षिण आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील सारखे देश सर्वात जास्त प्रभावित होऊ शकतात, जेथे तापमान आधीच गरम आहे.

एका अहवालानुसार भारतानं २००२,२००४, २००९ आणि २०१२ या वीस वर्षांत जे काही दुष्काळ पाहिले ते एल निनोमुळेच आले. एल निनो कधी ओसरेल याबद्दल हवामान तज्ञ काहीच सांगू शकत नाही, ते एक निसर्गातील संकट आहे.
मागील वर्षी प्रथमच केरळ मध्ये मान्सून आलाच नाही, आजही केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या दक्षिणेतील राज्यात तीव्र पाणी टंचाई व तीव्र उन्हाळा आहे.

महाराष्ट्रात दुष्काळ,चारा,पाणी टंचाई

राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या पैठणच्या जायकवाडीसह दहा मोठे प्रकल्प, ७६ मध्यम प्रकल्प आणि ७५० लघू धरणांतील साठा झपाट्याने घटत असून अर्ध्याहून अधिक लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे शेती सिंचन, पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन करणे अवघड ठरत आहे. जानेवारी पासून उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे, फेब्रुवारी महिन्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, खानदेश मधील ग्रामीण व शहरी भागात पाणी व चारा टंचाई जाणवत आहे.

गतवर्षी मराठवाड्यात अत्यल्प आणि रिमझिम पाऊस पडला. यामुळे खरीप पिकांचे उत्पादन ४० टक्क्यांहून कमी झाले आहे, गतवर्षी मुसळधार पावसाअभावी नदी-नाल्यांना पूर आला नाही. परिणामी मराठवाड्यातील नांदेड जिल्हा वगळता अन्य धरणांतील जलसाठा वाढला नाही.

राज्यात जलसंपदा विभागाकडील लहान, मध्यम व मोठे अशा एकूण दोन हजार ९९४ प्रकल्पांत १४२२.१२ टीएमसीपैकी ७२५.८३ टीएमसी (२०.५५९.३२ दशलक्ष घनमीटर) म्हणजेच ५० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या महिन्यात २३ जानेवारीच्या दरम्यान धरणांत ८०६.६६ टीएमसी म्हणजेच ५६ टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षी याच काळात ७२.७० टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत जवळपास २१.७० टक्क्यांनी पाणीसाठा यंदा कमी आहे.

मराठवाड्यातील धरणांत अत्यंत कमी पाणीसाठा आहे. एकूण ९२० धरणांत अवघा ७२.०३ टीएमसी म्हणजेच २८ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच धरणांत ७५ टक्के पाणीसाठा होता.

माजलगाव, रोशनपुरी, हिरडपुरी, मंगरूळ, लिंबाळा, मदनसुरी, शिवनी, टाकळगाव देवळा, निम्नदुधना या धरणांत १५ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. तर काही धरणे पूर्णपणे आटली आहेत.

नागपूर विभागातील धरणांत अजूनही बऱ्यापैकी पाणी आहे. एकूण ३८३ धरणांत ९५.०६ टीएमसी म्हणजेच ५८.४६ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी ६८ टक्के पाणी होते. अमरावती विभागातील २६१ धरणांत ८१.६३ टीएमसी म्हणजेच ६१ टक्के पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी ७६ टक्के पाणी होते. नाशिक विभागातील ५३७ धरणांत १११ टीएमसी म्हणजेच ५२ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या गेल्या वर्षी ७३ टक्के पाणीसाठा होता.

पुणे विभागात ७२० धरणांत २७९.७९ टीएमसी म्हणजेच ५२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी ७१ टक्के पाणीसाठा होता. कोकण विभागातील १७३ धरणांत ८६.२९ टीएमसी म्हणजेच ६५ टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षी ७३ टक्के पाणीसाठा होता.

राज्यात ३६३ गावं आणि ९५७ वाड्यांवर ३८३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात नाशिक विभागातील १५५ गावं आणि २८६ वाड्यांवर १२९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात १८ शासकीय आणि १११खाजगी टँकर्सचा समावेश आहे. पुणे विभागात ११५ गावं आणि ६९३ वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
हवामान तज्ञांच्या माहितीनुसार, सध्या (El Nino) चा प्रभाव आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही उष्माघाताचा त्रास आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड PCMC आदी मोठ्या शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याचे पाण्याचे बाष्पीभवन अधिक वेगाने होत आहे.

राज्यात कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशी जवळपास १३८ मोठी धरणे आहेत. या धरणांत ६०३.३४ टीएमसी म्हणजेच सरासरी ५८.७८ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात ८५.१६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी जवळपास २६.३७ टक्क्यांनी कमी पाणीसाठा झाला आहे.

संपूर्ण शहरी ग्रामीण भागात पाणी टंचाई तीव्र होणार आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात पाणी साठा फक्त ५८ टक्के आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करताना प्रशासनाची घालमेल होत आहे. नोव्हेंबर २०१९ पासून शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा केला जात आहे. शहरी भागात पाणी टंचाई बद्दल नागरिक दक्षता घेऊन पाण्याचा वापर करताना विशेष काळजी घेत नाहीत, शहरातील नव्याने विकसित झालेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना आताच टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे.

राज्यातील दुष्काळी स्थिती उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना राज्यसरकार हतबल होत आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक वाढून सरासरी तापमान फेब्रुवारी पासून ३९ डिग्री सेल्सियस पासून वाढायला सुरवात होईल. त्यामुळे नागरिकांनी सजग होऊन पाणी वापरल्यास पाणी संकट तीव्र होणार नाही.

संपादन-क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय