Friday, November 22, 2024
Homeआरोग्यमोठी बातमी : राज्यातील लॉकडाऊन वाढवला; सरकारने घेतला मोठा निर्णय.

मोठी बातमी : राज्यातील लॉकडाऊन वाढवला; सरकारने घेतला मोठा निर्णय.

(मुंबई):- कोरोनाचे संकट टळले नसून कोरोना ग्रस्तांची वाढणारी संख्या लक्षात घेता अनिर्बंध वावर रोखणे गरजेचे असल्याने लॉकडाउन वाढवला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केले आहे. यापूर्वी ३० जून नंतर हि लॉकडाउन सुरूच राहणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारीच फेसबुक लाइव्ह द्वारे दिले होते.

         दिवसेंदिवस वाढणारी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या हि चिंतेची बाब असून जोपर्येंत औषध सापडत नाही तो पर्यंत ऑन-ऑफ चालूच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सध्या लॉकडाउनची परिस्थिती जैसे थे असून ज्याठिकाणी अनलॉक आहे तिथे धीम्या गतीने म्हणजेच अनलॉक २ ची अंमलबजावणी टप्याटप्याने देण्यात आली आहे  तर रेड झोन मध्ये लॉक डाउन वाढवण्यात आला आहे. केवळ अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडता येणार आहे.

अनलॉक २ मधील काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे :

◾️ अत्यावश्यक सेवाच चालू राहतील.

◾️ मेडिकल चालू राहतील.

◾️ हॉटेल, रेस्टोरेंट येथील पार्सल व्यवस्था चालू राहील.

◾️ पेस्ट कंट्रोल, प्लम्बर या सुविधा चालू राहतील.

◾️ दिलेल्या अटी शर्थीनुसार सलून, पार्लर चालू राहतील.

◾️ सरकारी कार्यालयांमध्ये १५ % कर्मचाऱ्यांची उपस्थितीत चालू राहतील.

◾️ सध्या सुरु असलेले कारखाने चालू राहतील.

◾️ मास्क न घालणाऱ्यांना एक हजार रुपये दंड केला जाणार आहे.

◾️ विनाकारण फिरणाऱ्यांचे वाहन जप्त केले जाणार आहे.

◾️ सलून, व्यायाम, पार्लर या ठिकाणी जाण्याची मुभा जरी देण्यात असली तरी दोन किलोमीटरच्या आंतरमध्येच आपल्याला जाता येणार आहे.

◾️भाजीपाला खरेदी देखील दोन किलोमीटरच्या अंतरामध्येच करावी लागेल. मात्र हि अट वैद्यकीय व मेडिकल साठी लागू नाही.

◾️ सार्वजनिक ठिकाणी मास्क आवश्यक आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय