पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:मनोज जरांगेंच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता 25 जानेवारी रात्री 12 ते 26 जानेवारीला रात्री 11 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबई शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जालनाच्या अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा आज पुण्यात दाखल झाला आहे. तेथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
मनोज जरांगे यांची पदयात्रेचे पिंपरी चिंचवड शहरात सांगवी फाटा येथे आगमन झाले आहे,तेथे हजारो सकल मराठा बांधवानी त्यांचे जोरदार स्वागत केले.
तेथून ते निगडी भक्ती शक्ती येथे येणार आहेत,भक्ती शक्ती येथे हजारो पिंपरी चिंचवडकर त्यांच्या स्वागतासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.पिंपरी चिंचवड शहरात दुपारपासून मराठा आरक्षण समर्थक तरुण मुंबईला पदयात्रेत सामील होऊन जाणार आहेत.
निगडी येथील परिसर भगवामय झाला असून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी जनसागर मनोज जरांगे यांचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक झाला आहे.
अवजड वाहनास मुंबई प्रवेशास बंदी
25 जानेवारी रोजी हा मोर्चा नवी मुंबईत धडकणार आहे. यामुळे आता नवी मुंबई पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रात 25 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून 26 जानेवारी रोजी रात्री 8 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेशास मनाई केली आहे.
मुंबईत सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत निर्बध असणार आहेत.
ट्रक, ट्रेलर, मल्टी एक्सल वाहन व प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या आंतरराज्य आणि आंतरजिल्हा खाजगी बसेसना मुंबई शहरात सकाळी ०८.०० ते सकाळी ११.३० वा. पर्यंत दक्षिण वाहिनीवर व सायंकाळी १७.०० ते २१.०० वा पर्यत उत्तर वाहिनीवर प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.