Thursday, December 5, 2024
Homeताज्या बातम्यावंदेभारत मिशनअंतर्गत परदेशातून 5 हजार 557 नागरिकांचे परदेशातून आगमन

वंदेभारत मिशनअंतर्गत परदेशातून 5 हजार 557 नागरिकांचे परदेशातून आगमन

 (पुणे) : – वंदेभारत मिशनअंतर्गत चौथ्या टप्प्याची सुरुवात 4 जुलै 2020 पासुन सुरु झाली आहे. पुणे विभागामध्ये 23 जुलै 2020 अखेर पहिल्या टप्प्यामध्ये परदेशातून 457, दुस-या टप्प्यामध्ये 789 त्याचप्रमाणे तिस-या टप्प्यामध्ये 2 हजार 297, चौथ्या टप्प्यामध्ये 2014 अशा एकूण 5  हजार 557 व्यक्तींचे परदेशातून आगमन झालेले आहे.

       यामध्ये पुणे जिल्हयातील 4 हजार 568, सातारा जिल्हयातील 257, सांगली जिल्हयातील 218, सोलापूर जिल्हयातील 271 तर कोल्हापूर जिल्हयातील 243 व्यक्तींचा समावेश असल्याची  माहिती विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

संबंधित लेख

लोकप्रिय