Friday, November 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमहाराष्ट्रातील एक गाव जिथे दिवस फक्त 6-7 तासांचा असतो, स्वर्गाहूनही सुंदर आहे...

महाराष्ट्रातील एक गाव जिथे दिवस फक्त 6-7 तासांचा असतो, स्वर्गाहूनही सुंदर आहे हे गाव

महाराष्ट्रातील एक गाव जिथे सूर्योदय दोन ते अडीच तास उशीरा होतो आणि सूर्यास्त दोन-अडीज तास आधी होतो. या गावात दिवसच फक्त 6 ते 7 तासांचा असतो असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. सह्याद्रीच्या डोंगररांगात हे छोटंस गाव वसलं आहे. या गावाचे नाव आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगररांगात हे वास वसलं आहे. फोफसंडी असं या गावाचे नाव आहे. या गावाच्या नावाचीही रंजक गोष्ट आहे. भारतात ब्रिटिशांची राजवट होती तेव्हा फॉफ नावाचा एक इंग्रज अधिरारी सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी विश्रांतीसाठी या निसर्गरम्य अशा गावात जात असे. तेव्हा पासून या ठिकाणाचे नाव फॉफसंडे असं पडले. पुढे त्याच शब्दाचा अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव पडले आहे.

फोफसंडी गावात अजूनही ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या गेस्ट हाउसचे अवशेष आहेत. या गावाला निसर्गाने भरभरून दिले आहे. नदी, धबधबा, हिरवाई, डोंगर असल्याने गर्द हिरवी वनराई, दुर्मिळ पशु-पक्षी, जैववैविध्य या गावात आढळते. फोफसंडी हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील आहे. गावात बारा वाड्या असून वळे, पिचड, कोंडार, भगत, पिचड, तातले, गोरे, उंबरे, गवारी, मेमाणे, भांगरे व भद्रिके अशी आडनावाची लोक इथे राहतात.

1200 लोकसंख्या, बारा वाड्या व बारा आडनावाचे लोक इथे राहतात. गावात बारा वाड्या असून वळे, पिचड, कोंडार, भगत, पिचड, तातले, गोरे, उंबरे, गवारी, मेमाणे, भांगरे व भद्रिके अशी आडनावाची लोक इथे राहतात. या गावातील मुख्य व्यवसाय म्हणजे शेती. पावसाळ्याच्या चार महिन्यात शेतीत उगवेल ते कमवून आठ महिने रोजदांरीसाठी पुणे किंवा ठाणे जिल्ह्यात जातात. गावात मुख्यतः भात, नागली, वरई पिके घेतली जातात.


निसर्गाने या गावावर मुक्तहस्ताने उधळण केली आहे. मात्र, रस्ता, पाणी, वीज यासारख्या भौतिक गरजा अजूनही प्रत्येकाला मिळाल्या नाहीयेत. शेतीला पाणी नसल्याने इतर पिके घेता येत नाहीत. मांडवी नदीचा उगम फोफसंडी गावाच्या हद्दीतच होतो. इथल्या एका गुहेतून मांडवी नदी वाहते. पावसाळ्यात या गावात तुफान पाऊस पडतो. फोफसंडीचा धबधबा खूप लोकप्रिय आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय