Sunday, December 22, 2024
HomeआंबेगावGhodegaon : घोडेगाव येथे शहिद भगतसिंग यांना अभिवादन

Ghodegaon : घोडेगाव येथे शहिद भगतसिंग यांना अभिवादन

घोडेगाव : शहिद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त घोडेगाव येथे एस.एफ.आय., किसान सभा व आदिम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादनाचा कार्यक्रम एस.एफ.आय.चे राज्य समिती सदस्य प्रा. संदिप मरभळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून बाबुराव आंबवणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. Salute to Shahid Bhagat Singh at Ghodegaon

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बाबुराव आंबवणे यांनी “भगतसिंग यांचे विचार आजच्या तरुणाईसाठी प्रेरणा देणारे असून युवकांनी ते आचरणात आणले पाहिजेत.” असे सांगून भगतसिंग यांच्या विचारांवर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संदिप मरभळ यांनी भगतसिंग यांचा क्रांतिकारी जीवनपट उलगडून सांगताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या 23 व्या वर्षी मृत्युला सुद्धा हसत हसत सामोरे गेलेल्या भगतसिंगांच्या स्वप्नातील समाजवादी भारत घडवण्याची जबाबदारी आपल्या पुरोगामी चळवळीची आहे.

भगतसिंगांच्या विचार व क्रांतीकार्याला आदर्श मानून आपण अभ्यास व संघर्ष केला पाहिजे.” असे त्यांनी यावेळी आवाहन केले.

कार्यक्रमाला किसान सभेचे नेते राजू घोडे, आदिम संस्थेच्या रिना मुंढे, एस.एफ.आय चे कार्यकर्ते संचित कौदरे, विशाल पेकारी, साहिल जंगले आदी विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसान सभेचे कार्याध्यक्ष बाळु काठे यांनी केले, प्रास्ताविक एस.एफ.आय. पुणे जिल्हाध्यक्ष अविनाश गवारी यांनी तर आभार प्रदर्शन, एस.एफ.आय. आंबेगाव तालुका समितीचे उपाध्यक्ष रोशन पेकारी यांनी केले.

संबंधित लेख

लोकप्रिय