पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : वाकड येथील दर्यावर्दी क्रीडा मंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव 2023 च्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दि . २४ रोजी दर्यावर्दी पुरस्कार देवून गौरवण्यात आले. Daryawardi Award to Mali, Dr. Helambe, Chavan, Vakadkar
यावेळी म फुले मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी यांना “दर्यावर्दी समाज भूषण पुरस्कार तर डॉ. धनराज हेळांबे यांना “दर्यावर्दी युवा प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शोभाताई चव्हाण-कळमकर यांना “दर्यावर्दी आदर्श शिक्षिका पुरस्कार तर सर्पमित्र कु. काजल वाकडकर यांना “दर्यावर्दी रणरागिणी शौर्य पुरस्कार देवून गौरवण्यात आले.
पुरस्काराला उत्तर देताना हणमंत माळी म्हणाले कि, पुरस्कार केवळ माझा नसुन पिंपरी चिंचवड शहरातील महात्मा फुले मंडळाचे सर्वसभासद यांच्या वतीने हा पुरस्कार मी स्विकारत आहे असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी संगीत खुर्ची, चमचा लिंबू स्पर्धा, भजनसेवा, मृदंग सोलोवादन, शालेय गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
पुरस्कार विरतण सोहळयास अऱण येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त हभप साखरचंद महाराज लोखंडे यांनी या पुरस्कार सोहळयाच्या माध्यमातून ज्यांनी आदर्श काम केले आहे, त्यांना त्यांच्या कामाची पावती मिळते व इतरांसाठी प्रेरणा मिळते, असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य जय मल्हार संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब मदने, हभप प्रभू महाराज माळी, सावता प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुखदेव खेडकर, पिंपरी चिंचवड ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष आनंदा कुदळे, महात्मा फुले मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल साळुंके, सुर्यकांत तुम्हाणे, पवना सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अमर ताजणे, नितीन ताजणे, चैतन्य भुजबळ, निवीनचंद्र गिरमे, वैजनाथ माळी, दत्तात्रय चव्हाण, सुरेश बनकर व मंडळाचे सर्व सभासद आणि गणेशोत्सव भक्त उपस्थित होते.