Friday, December 27, 2024
Homeग्रामीणचोखाळा येथे गावातील विद्यार्थ्यांनी दिले गांडूळ खत निर्मिती प्रात्याक्षिक

चोखाळा येथे गावातील विद्यार्थ्यांनी दिले गांडूळ खत निर्मिती प्रात्याक्षिक

रामटेक (नागपूर) : रामटेक तालुक्यातील चोखाळा येथे गावातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना गांडूळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक दिले. राजश्री शाहू महाराज  कृषी व्यवसाय महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षात अमित हटवार व आशिष महादूले हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या साथीमुळे महाविद्यालय ऑनलाइन सुरू असल्याने विद्यार्थी आपल्या घरातून शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचे माहिती सांगताना गांडूळ खत करण्याचे प्रात्यक्षिक गावातील शेतकऱ्यांना करून दाखविले. 

गावातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकरिता गांडूळ खताचे महत्व पटवून दिले. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्र्व्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्र्व्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्वाचा घटक आहे, अशी माहिती शेतकऱ्यांना दिली.

या कार्यक्रमाला प्रा. राजकुमार सोनवणे, प्रीती बोपचे, नेहा रामटेके यांचे मार्गदर्नश लाभले. यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय