Thursday, December 26, 2024
Homeग्रामीणपिंपरी मध्ये सर्व पक्षीय व समविचारी संघटनेच्यावतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त...

पिंपरी मध्ये सर्व पक्षीय व समविचारी संघटनेच्यावतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

पिंपरी : महापुरुषांचे विचार हे मानवी मनाला प्रेरणा देत असतात. प्रत्येक महापुरुषांचे विचार आज स्वत:मध्ये उतरविण्याची गरज आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी समाजसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं. शिक्षण आणि स्वच्छतेचे महत्व गाडगे बाबांनी समाजाला पटवून दिले असे प्रतिपादन माजी. विरोध पक्षनेते नगरसेवक कैलास कदम यांनी केले.

कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जन आंदोलनांची संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिनिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते.

सर्व पक्षीय व समविचारी संघटनेच्यावतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आपले विचार व्यक्त करतांना मानव कांबळे म्हणाले की, गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील अनेक रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छतेची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती – बोलती पाठशाळा होती असेही ते म्हणाले.

डॉ. सुरेश बेरी यांनी आपल्या मनोगतामध्ये हे अधोरेखित केले की, आज जर राष्ट्रसंत गाडगेबाबा असते तर नक्कीच ते दिल्लीला शेतकरी आंदोलनात सहभागी झाले असते कारण बाबांनी नेहमी शेतकरी, कामगार, होतकरू दिनदुबळ्या समाजासाठी कार्य केले आहे.

यावेळी आनंदा कुदळे, सुरेशशेठ गायकवाड, माजी नगरसेवक मारुती भापकर, कॉम्रेड गणेश दराडे, संतोष गोठावले, ज्ञानेश्वर मुळे, छायाताई देसले, काशिनाथ नखाते, नीरज कडू, सतीश काळे, धनाजी येळकर पाटील, रफिकभाई कुरेशी, नितिन बनसोडे, भाई विशाल जाधव, प्रताप गुरव, अशोक मिरगे, सतिष काळे, सिद्दीकभाई शेख समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाई विशाल जाधव यांनी केले सूत्रसंचालन गिरीशभाऊ वाघमारे व आभार संतोष गोठावले यांनी मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय