Thursday, December 26, 2024
Homeग्रामीणआंबेगाव : वाढीव वीज बिले कमी करणार; किसान सभेला वीज विभागाचे लेखी...

आंबेगाव : वाढीव वीज बिले कमी करणार; किसान सभेला वीज विभागाचे लेखी आश्वासन. वाचा सविस्तर

आंबेगाव (पुणे) : वाढीव वीज बिले कमी करण्याच्या मागणीला घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने आज ६ जानेवारी २०२१ रोजी उपकार्यकारी अभियंता एन. एन. घाटुळे यांची भेट घेऊन निवेदन देत सविस्तर चर्चा केली.

लॉकडाऊन काळात संबंध आंबेगाव तालुक्यामध्येभरमसाठ वाढीव विजबिले आली आहेत. यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांच्या समस्या लक्षात घेत किसान सभेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली व चर्चा केली. यावेळी वाढीव विजबिले कमी करण्याचे लेखी आश्वासन वीज विभागाने किसान सभेच्या शिष्टमंडळास दिले.

या शिष्टमंडळात किसान सभेचे तालुका कार्यकारणी सदस्य अनिल सुपे, सामाजिक कार्यकर्त्या शैलाताई आंबवणे, किसान सभेचे कार्यकर्ते सखाराम गारे, पांडुरंग सुपे उपस्थित होते. 

  

वीज विभागाने मान्य केलेल्या मागण्या खालीलप्रमाणे : 

1. वीज विभागाचे अधिकारी दर गुरुवारी तळेघर येथे व दर बुधवारी अडविरे येथे बाजाराच्या दिवशी  उपस्थित राहतील, व  यावेळी नागरिकांची वीज बिले कमी करून दिली जाणार. 

2. तिरपाड येथे ही वीज विभागाचे प्रतिनिधी यांनी बाजाराच्या दिवशी येऊन वीज बिल कमी करून द्यावीत. यासाठी व नियमित मीटर रिडींग घ्यावी व नादुरुस्त मीटर बदलून देण्यासाठी किसान सभा यापुढे ही पाठपुरावा करणार आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय