Monday, May 6, 2024
Homeराज्यमोठी बातमी : राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ; "या"...

मोठी बातमी : राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ; “या” तारखे पासून सुरू होणार महाविद्यालय

मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे बंद असलेली शाळा, महाविद्यालय कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता राज्यभरातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीला सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकारपरिषदे मध्ये दिली. 

यावेळी उदय सामंत म्हणाले, महाविद्यालयं सुरू करत असताना एक महत्वाची भूमिका विद्यापीठांची किंवा खासगी विद्यापीठांची असायला हवी. यूजीसीने सांगितल्याप्रमाणे वर्ग खोल्यांमध्ये बसण्याच्या व्यवस्थेच्या ५० टक्के रोटेशन पद्धतीने विद्यार्थ्यांची संख्या घेऊन महाविद्यालयं सुरू करण्यास राज्य सरकारने आज परवानगी दिली आहे. याचा अर्थ ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालयं सुरू होतील. विद्यापीठं महाविद्यालयं १५ फेब्रवारीपासून सुरू करू शकतात, अशा पद्धतीचा निर्णय आज घेण्यता आला आहे.

५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालयं सुरू होणार आहेत. तसेच, या वर्षी विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक नसणार आहे. ही महाविद्यालयं सुरू होत असताना विद्यापीठ अनुदान आयोगाने देखील काही गाइडलाईन्स विद्यापीठांना दिलेल्या आहेत. प्रत्येक महाविद्यालयास कोरोना नियमावलीचे पालन बंधनकारक असणार आहे.

वसतिगृह टप्प्याटप्प्याने सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करुन वसतिगृहाचे इलेक्ट्रिक व सेफ्टी ऑडिट करुन घेण्यात यावे, असेही विद्यापीठांना सूचित करण्यात आले आहे. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय