Sunday, December 22, 2024
Homeराज्यलेखिका डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन

लेखिका डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी पुण्यात राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत्या.

डॉ. मंगला नारळीकर या गेल्या काही दिवसांपासून कर्करोगामुळे आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातून त्या बऱ्या झाल्या होत्या. मात्र, हा आजार पुन्हा उफळल्याने त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सोमवारी पुण्यातील राहत्या घरी डॉ. मंगला नारळीकर यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे ११ वाजता अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्या पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आयूका येथे ठेवण्यात येणार आहे.

पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे यांचा जन्म १७ मे १९४३ रोजी झाला. मंगला नारळीकर यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बीए ही पदवी घेतली होती. त्यानंतर १९६४ साली त्या एम.ए. (गणित) झाल्या. या परीक्षेत त्यावेळी त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या होत्या. त्यांना तत्कालीन कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले होते. तसेच १९६७ ते १९६९ मध्ये केंब्रिज विद्यापीठात देखील गणिताचे अध्यापन केले.

डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत. लहान मुलांना सोप्या भाषेत गणित समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. शालेय विद्यार्थ्यांसाठीचे गणिताच्या सोप्या वाटा, नभात हसरे तारे, पहिलेले देश, भेटलेली माणसं हे प्रवासवर्णन यासारखी त्यांची पुस्तकं विशेष गाजली.

हे ही वाचा :

आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात, ‘ही’ विधेयक मांडली जाणार

समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून

अभिनेता अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार ? ‘या’ पक्षात होणार सहभागी चर्चांना उधान

धक्कादायक : ब्लेडने गुप्तांग कापून २० वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या

‘सीमे’पलीकडची सीमा हैदर कोण? चर्चेला उधाण

MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 133 पदांची भरती; आजच करा अर्ज

संबंधित लेख

लोकप्रिय