Friday, December 27, 2024
Homeआरोग्यकोरोनापूर्णा : जिल्ह्यात संचारबंदी शिथिल करण्याची 'डीवायएफआय'ची मागणी

पूर्णा : जिल्ह्यात संचारबंदी शिथिल करण्याची ‘डीवायएफआय’ची मागणी

पूर्णा : डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया(DYFI) कडून परभणी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीला शिथिल करण्याबाबत पूर्णा तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देण्यात आले.

डीवायएफआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षभरात गोरगरीब कष्टकऱ्यांचे कंबरडे या करोना काळात मोडले असून हातावर पोट असणाऱ्यांसाठी हि संचारबंदी म्हणजे मोठा आघात आहे. शासन आणि प्रशासनाने याबद्दल गांभीर्याने विचार करण्याची गरज होती परंतु त्याचा विचार न करता सरळ संचारबंदी लागू करणे म्हणजे या कष्टकऱ्यांना उपाशी मारणे होय. याच्या माध्यमातून लोकांच्या आर्थिक आणि मानसिक अवस्थेचे जास्तीच खच्चीकरण होत आहे. याचा परिणाम म्हणून लोक म्हणत आहेत की ‘करोनाने मरू पण उपाशी नको’. 

या पार्श्वभूमीवर “डीवायएफआय” या युवक संघटनेने तहसीलदार पूर्णा यांच्यामार्फत जिल्हाधिकारी परभणी यांना करोनाचे सर्व निर्बंध पाळून संचारबंदी शिथिल करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी नसीर शेख, आनंद वाहिवळ, अमन जोंधळे, जय एंगडे, अजय खंदारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय