Friday, December 27, 2024
Homeजिल्हानाईट कॉलेज कोल्हापूरचे निवृत्त प्रा.डॉ.मधुकर गोसावी यांचे निधन !

नाईट कॉलेज कोल्हापूरचे निवृत्त प्रा.डॉ.मधुकर गोसावी यांचे निधन !

कोल्हापूर : नाईट कॉलेज कोल्हापूरचे निवृत्त प्रा.डॉ.मधुकर गोसावी यांचे आज (दि. ५ एप्रिल) दुपारी अल्पशा आजाराने वयाच्या ६५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. पुरोगामी, डाव्या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असे. त्यांच्या जाण्याने प्राध्यापक, शिक्षक चळवळीची मोठी हानी झाली आहे.

प्रा.डॉ.गोसावी हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील असून नोकरीच्या शोधार्थ कोल्हापूराला आले आणि नाईट कॉलेज कोल्हापूर येथे नोकरी मिळविली. जीवनाच्या वाटेवर असताना सुरुवातीस असंख्य सुख दुःखाना सामोरे जात अत्यंत कष्टप्रद जीवन जगत प्राध्यापक पेशापर्यंत ते पोहोचले. अत्यंत अभ्यासू, कष्टाळू, संवेदनशील व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्राध्यापकांनी कधीही आपल्या गावाशी व वंचित घटकांशी नाळ तोडली नाही. 

प्राध्यापकांच्या न्याय हक्कांसाठी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) च्या माध्यमातून अनेक आंदोलनात हिरारीने सहभागी होत. सुटा संघटनेत एक प्रामाणिक व सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी सुटा प्रतिनिधी व सुटाने सोपविलेल्या इतर जबाबदाऱ्या अतिशय प्रामाणिक व चोखपणे पार पाडल्या. शिक्षक आमदार निवडणुकीच्या निमित्ताने प्रा.डॉ. सुभाष जाधव यांच्या प्रचारार्थ एका प्रामाणिक कार्यकर्त्याला शिक्षक आमदार पद मिळावे यासाठी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जातीने लक्ष घालून प्रचार करीत होते. 

मात्र कोरोना महामारीच्या दरम्यान श्वसन नलिकेचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्यानंतर मात्र सर्व प्रकारचे उपचार केल्यानंतरही आजार बळावत गेला. आणि आज (दि. ५ एप्रिल) दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

“प्रा. मधुकर गोसावी सर नेहमी सुटा च्या कामात हिरारीने भाग घेत. शिक्षकांचा खंबीर प्रतिनिधी विधानपरिषदेत असला पाहिजे, यासाठी त्यांनी माझ्या प्रचारात सुरुवातीपासून अग्रभागी राहिले. प्रचाराच्या काळातच त्यांना श्वासाचा त्रास जाणवू लागला. कॅन्सर निदान झाले. गोसावी सरांच्या जाणण्याचे प्राध्यापक, शिक्षण चळवळीतील एक सच्चा, प्रामाणिक सहकारी गमवल्याबद्दल अतिव दु: ख आहे. त्यांचा पुरोगामी – डावा विचार पुढे घेऊन जाण्याने हीच त्यांना आदरांजली ठरेल.”

प्रा. डॉ. सुभाष जाधव, सहकार्यवाह

शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा)


संबंधित लेख

लोकप्रिय