Thursday, December 26, 2024
Homeग्रामीणसुरगाणा : गेल्या दोन महिन्यांपासून सुरक्षा रक्षक वेतनापासून वंचित

सुरगाणा : गेल्या दोन महिन्यांपासून सुरक्षा रक्षक वेतनापासून वंचित

भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेना संघटनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन

सुरगाणा (दौलत चौधरी) : नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक हे नाशिक महानगरपालिका मध्ये गोदाघाट, कोविड केंद्र, दवाखाने, मनपा शाळा इत्यादी ठिकाणी ३५० ते ४०० सुरक्षा रक्षक आज देखील कार्यरत आहेत. कोरोनासारख्या महामारीत सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक आपल्या जीवाची परवा न करता व मोठ्या इमानदारीने तसेच मोठया इतबरीने काम करत आहेत. तरीदेखील त्यांना महानगरपालिका वेळेवर वेतन करीत नाही, गेल्या दोन महिन्याचे वेतन थकीत आहे. कार्यरत सुरक्षा रक्षकांचे व त्यांच्या कुटूंबियाची उपासमारी होत आहे.

भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेना संघटनेच्या वतीने मंडळाने निश्चित केलेल्या वेतना एवढे वेतन व महागाई भत्ता देण्यात यावे, मंडळाच्या सुरक्षा रक्षकांचे वेतन देण्यास सोयीचे होईल व सुरक्षा रक्षकांचे जीवन व्यवस्थित रित्या रुळावर चालेल अन्यथा त्याचे जीवन विस्कळीत होईल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी सचिन भाऊ राऊत, परड अण्णा, शिरद राजभोज आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय