Friday, December 27, 2024
Homeग्रामीणप्रत्येकाने आपला जीव वाचवायचा असेल तर लाॅकडाऊन शिवाय पर्याय नाही - तहसिलदार...

प्रत्येकाने आपला जीव वाचवायचा असेल तर लाॅकडाऊन शिवाय पर्याय नाही – तहसिलदार किशोर मराठे

सुरगाणा (दौलत चौधरी) : प्रत्येकाने आपला जीव वाचवायचा असेल तर लाॅकडाऊन शिवाय पर्याय नाही, असे तहसिलदार किशोर मराठे म्हणाले. थोड्याफार प्रमाणात दिलेली सुट ही व्यवसायिक यांच्या सोयीसाठी नसून जनतेच्या हितासाठी आहे, असे त्यांनी बैठकीत सांगितले.    

  

सुरगाणा शहरासह तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता तहसिल कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत सोमवार ते गुरुवार हे चार दिवस सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

तहसिलदार किशोर मराठे म्हणाले की, सदर निर्णय हा गर्दी  नियंत्रणात आणण्यासाठी घेण्यात आला आहे. पहिल्या लाटे पेक्षाही परिस्थिती भयानक निर्माण झाली आहे. “सीर सलामत तो पगडी पचास” म्हणून  दुकानदारांनी माॅस्क, सहा फुट अंतरावर उभे राहण्याची खुणा केलेली सोय, सॅनिटायझर या गोष्टीची काटेकोरपणे  पालन करावे. अनावश्यक कामासाठी बाहेर पडणा-यांची रस्त्यावरची चाचणी सुरगाणा, बोरगाव, बा-हे, मनखेड, उंबरठाण, पांगारणे, पळसन, चिंचपाडा गुही, नागझरी घागबारी,हतगड या वर्दळीच्या चौफुलीवर  करण्यात येईल. 

तहसिल कार्यालयात अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या 

व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चर्चेअंती त्यावर उपाय म्हणून अत्यावश्यक सेवा ही सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत सुरू ठेवावी. बारा वाजता दुकाने स्वंयस्फुर्तोने बंद करण्याचे आवाहन यावेळी तहसिलदार मराठे यांनी केले. त्यास उपस्थित सर्व व्यावसायिकांनी प्रशासन जो निर्णय घेईल ते मान्य असल्याचे सांगितले. 

शुक्रवार, शनिवार व रविवार हे तीन दिवस मेडिकल व दवाखाने वगळता इतर व्यवसाय बंद राहणार आहेत. तालुक्यात देखील याचप्रकारे व्यवसाय चालू व बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देऊन कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी आरोग्य विभाग, पोलिस व महसूल प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मराठे यांनी यावेळी केले.

याप्रसंगी बाऱ्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लोखंडे, सुरगाणा येथील सहायक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे किराणा व्यापारी पवन कोरीमुथा, बाळकृष्ण संधानशिव, धर्मेंद्र पगारिया, संतोष बागुल, विलास कुंमट, मोना पगारिया, सोना पगारिया, निलेश खरोटे, कैलास बत्तासे, सुनिल पवार, चेतन संधानशिव, विठ्ठल थोरात हे उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय