Friday, December 27, 2024
Homeराष्ट्रीयसावधान ! Whatsapp आता गुलाबी रंगाचे होणार या व्हायरल मेसेजला क्लिक करू...

सावधान ! Whatsapp आता गुलाबी रंगाचे होणार या व्हायरल मेसेजला क्लिक करू नका, अन्यथा…

नवी दिल्ली : सध्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज खूप व्हायरल होत आहे. यात म्हटले की Whatsapp आता हिरव्या रंगात नाही तर पिंक म्हणजेच गुलाबी रंगात बदलण्यात येणार आहे. हा दावा करतानाच एक लिंक सुद्धा दिली आहे. सायबर तज्ज्ञांनी या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्ही या लिंकला क्लिक केले तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

मेसेजचा दावा- गुलाबी रंगाचे बनणार व्हॉट्सअॅप

व्हायरल मेसेज मध्ये दावा करण्यात येत आहे की, या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचे व्हॉट्सअॅप गुलाबी रंगाचे होईल. तसेच त्यात नवीन फीचर्स सुद्धा जोडले जातील. याला व्हॉट्सअॅपचे अधिकृत अपडेट सांगितले जात आहे. अॅप  डाउनलोड लिंक सोबत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये व्हायरस पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लिंकला क्लिक केल्यानंतर फोन हॅक होत असून तुम्हाला तुमचा फोन वापरणे अवघड होईल. या प्रकाराने तुमचे फोटो, एसएमएस, संपर्क आदी चोरी केले जाऊ शकते.

असे धोकादायक आहे हे अ‍ॅप

हे ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ते काही परवानगी मागतात त्यावेळी ते सांगतात की आम्ही तुमच्या सर्व नोटिफिकेशन वाचू शकतो त्यामध्ये तुमचे संपर्क नंबर, नावे तसेच मेसेज अशी सर्व वैयक्तिक माहिती देखील वाचू शकतो. यामुळे आर्थिक व्यवहाराचे मेसेज देखील ते पाहू शकतात त्यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. 

त्याबरोबर हे सूचना डिसमिस करण्यात किंवा त्यांच्यात असलेल्या अ‍ॅक्शन बटणावर ट्रिगर करण्यात सक्षम होईल तसेच या अ‍ॅपला त्रास देणाऱ्या किंवा बंद करण्याची आणि संबंधित सेटिंग्ज बदलण्याची क्षमता देखील असल्याचे त्यांनी परवानगी मागते वेळी धक्कादायक माहिती दिली आहे. हा ऑनलाइन फ्रॉड किंवा मोबाईल हॅकिंगचा देखील प्रकार असू शकतो.

आपोआपच होत आहेत मेसेज शेअर

ज्या लोकांनी या लिंकवर क्लीक केले आहे किंवा हे ऍप्लिकेशन डाउनलोड केले आहे त्यांच्या फोन वरून स्वतःहून व्हाट्सएपवर कोणतीही लिंक शेअर न करता आपोआपच या वेबसाईटची लिंक शेअर होत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

अशी घ्या काळजी

अशा गोष्टी पासून दूर राहण्यासाठी फ्री सेवा देणाऱ्या कोणत्याही अनोळखी वेबसाईटवर क्लीक करू नये, कोणत्याही गोष्टीची खातरजमा झाल्याशिवाय तिथे आपली वैयक्तिक माहिती देऊ नये, सुरक्षित नसलेले कोणतेही ऍप्लिकेशन डाऊनलोड करू नये.

ज्यांच्या फोन मध्ये हे ऍप्लिकेशन डाउनलोड झाले आहे त्यांनी काय करावे

ज्या लोकांच्या फोन मध्ये हे ऍप्लिकेशन डाऊनलोड झाले आहे त्यांनी तात्काळ फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ते ऍप्लिकेशन अनइंस्टोल करून डिलीट करावे. तसेच ऍप्लिकेशनचा सर्व डेटा क्लीअर करावा.


संबंधित लेख

लोकप्रिय