Wednesday, April 30, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोदींवर जगभरातून टिका, अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे भारताचा मसणवटा

---Advertisement---

दुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे. काही ठिकाणी त्याचा काळा बाजारही होत आहे. दिल्लीत रुग्णच प्राणवायू सिलिंडर घेऊन येताना दिसले. गेल्या वर्षी स्थलांतरितांचे जे लोंढे दिसले त्याची पुनरावृत्ती यावेळीही झाली. या वास्तवाचे तपशिलात वृत्तांकन आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केलेले आहेच, पण परदेशी दैनिकांच्या वृत्तलेख व संपादकीयांनी भारतीय नेतृत्वाच्या गफलतींचाही पाढा वाचला आहे. देशात दररोज करोनारुग्णांचा आणि विषाणूच्या बळींचा नवा कळस समोर येत असताना जगभरातील माध्यमांनी भारताच्या करोना हाताळणीतील दोष दाखवताना टीकेचा चढा सूर लावला आहे.

---Advertisement---

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अतिआत्मविश्वास आणि चुकीच्या निर्णयामुळे हिंदुस्थानचा मसणवटा झाला. लोकांना रुग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि जरुरी औषधांसाठी वणवण भटकावे लागत आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास स्मशान आणि कब्रस्तानातही जागेसाठी मारामार सुरू आहे, अशा शब्दांत परदेशी मीडियाने मोदी सरकारची अब्रू जगाच्या वेशीवर टांगली आहे.

हिंदुस्थानात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. आठ दिवसांपासून देशात बाधितांचा आकडा साडेतीन लाखांच्या पुढे गेला आहे. मृत्यूदरही कमालीचा वाढला असून रुग्णांची बेड, ऑक्सिजन आणि औषधांसाठी वणवण होत आहे. हिंदुस्थानातील या विदारक परिस्थितीचा परदेशी मीडियाने आढावा घेतला असून यासाठी मोदी सरकारलाच जबाबदार ठरवले आहे.

अमेरिकेतील सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र असलेल्या ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने आपल्या 24 एप्रिलच्या संपादकीयात कोरोना नियमात सवलती देण्यात आल्यानेच हिंदुस्थानात दुसऱ्या लाटेची भयानकता वाढली, असे स्पष्ट म्हटले आहे. कोरोनासारख्या महामारीला लोकांनी गांभीर्याने घेतले नाही. कुंभमेळा, क्रिकेटसारख्या इव्हेंटमध्ये मोठय़ा प्रमाणावर असलेली प्रेक्षकांची उपस्थिती याचे चांगले उदाहरण आहे. तसेच ”पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या स्वत:च्या आकलनाने काही निर्णय घेतले. तज्ज्ञांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले, त्यांच्या चुकांचे परिणाम आज भोगावे लागत आहेत” असे ब्रिटनच्या गार्डियन वृत्तपत्राने अग्रलेखात म्हटले आहे. 

”नरेंद्र मोदींच्या अतिआत्मविश्वासामुळे हे सारे घडले. मोदींनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्बंध कसे राखावेत याचा विचार करायला हवा होता. आपण जे बोलतो ते करतो हे दाखवायला हवे होते. भविष्यातील इतिहासकार या निर्णयांबाबत मोदींचे कठोर मूल्यमापन करतील,” असेही या अग्रलेखात म्हटले आहे. 

ब्रिटनमधील प्रतिष्ठत वर्तमानपत्र ‘द गार्डियन’ने हिंदुस्थानातील विदारक परिस्थितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवले आहे. मोदी यांच्या अति आत्मविश्वासामुळेच हिंदुस्थानात कोरोनाचा संसर्ग वाऱयासारखा पसरला असे ‘गार्डियन’ने म्हटले आहे. कोरोनामुळे लोकांचे हाल हाल होत आहेत. रुग्णालयात बेड, ऑक्सिजन नाही. अशी भयंकर परिस्थिती असतानाही पंतप्रधान मोदी यांनी मात्र हिंदुस्थानला ‘वर्ल्ड फार्मसी’ म्हणून घोषित केले. वास्तविक लोकसंख्येच्या तुलनेत एक टक्का लसीकरण झालेला नसल्याचं म्हटलं आहे.

---Advertisement---

‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने मोदी सरकारचे चुकीचे निर्णय आणि अक्षम्य दुर्लक्षामुळेच कोरोनाचा फैलाव झाल्याचा स्पष्ट आरोप केला आहे. वर्षभरापूर्वी अतिशय कडक लॉकडाऊन करून हिंदुस्थानने कोरोनावर बऱयापैकी नियंत्रण मिळवले होते. मात्र नंतर तज्ञांच्या इशाऱयांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळेच आज कोरोना बेकाबू झाला आहे, असे या वर्तमानपत्राने म्हटले आहे. 

अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या महत्त्वाच्या वृत्तपत्राने भारतात टाळेबंदी फार आधी लावली गेल्याबाबत टीकास्त्र सोडले आहेच आणि दुसरी लाट वाढत असूनसुद्धा क्रिकेट, कुंभमेळा आणि इतर धार्मिक कार्यक्रम कुठल्याही नियमनाविना साजरे झाल्याबद्दल त्यांनी केंद्रीय नेतृत्त्वाचे वाभाडे काढले. हे सारे टाळता आले असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘बीबीसी’ने भारतीय आरोग्य यंत्रणेतील ढिसाळ कारभारावर बोट ठेवले.

अधिक वाचा 

सोशल मीडियावर मोदींच्या राजीनाम्याची केली जातेय मागणी ; सातत्याने केला जातोय “हा” ट्रेंड

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles