Friday, December 27, 2024
Homeकृषीखत दरवाढ त्वरित रद्द करण्याची खा. अमोल कोल्हे यांची मागणी

खत दरवाढ त्वरित रद्द करण्याची खा. अमोल कोल्हे यांची मागणी

नारायणगाव (जुन्नर) : खत दरवाढ त्वरित रद्द करावी, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे की, खरीप हंगाम सुरू होताच खत कंपन्यांनी खताच्या किंमतीत वाढ केली आहे. खतांच्या किंंमतीत झालेली ६० टक्के दरवाढ शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणत आहे.  कोविड १९ चे सुरू असलेले संकट आणि त्यानंतरच्या निसर्ग चक्रीवादळाने आधीच शेतकरी संकटात आणले आहेत. त्याशिवाय गारपीट, अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकरी पूर्णपणे नष्ट झाला आहे. अशा कठीण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, शेतकर्‍यांना मदतीचा हात मिळण्याची अपेक्षा आहे, तर खत कंपन्यांनी केलेल्या 60 टक्के दरवाढीमुळे शेतकर्‍यांची कंबरडे मोडेल. म्हणून कंपन्यांनी खत दरवाढ त्वरित रद्द करण्याचे आदेश केंद्र सरकारने देण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे.

राज्यातील कोविड संकट, तौक्ते चक्रीवादळ, अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या पार्श्वभूमीवर त्रासलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून खत कंपन्यांनी 60 टक्के वाढ रद्द करावीत असेही विनंती खा. कोल्हे यांनी केली आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय