Friday, April 19, 2024
Homeजिल्हाजुन्नर : चिल्हेवाडी गावचे सुपुत्र विनोद भोईर सिमेवर शहीद

जुन्नर : चिल्हेवाडी गावचे सुपुत्र विनोद भोईर सिमेवर शहीद

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील चिल्हेवाडी गावचे सुपुत्र शहीद विनोद नामदेव भोईर (वय ३८) हे भारतीय सेना दलात मिझोरम बॉर्डर येथे कार्यरत असताना शहिद झाले.

शहीद विनोद भोईर हे भारतीय सेना दलामध्ये काम करत असतांना, ते कारगिल, नागालँड, काशी, हिमाचल प्रदेश आणि मिझोराम या ठिकाणी कार्यरत होते. ते कर्तव्यावर असताना (ता. १३) मे रोजी सकाळी ७.१५ वाजता शहीद झाले. त्यांच्यावर ता. १५ मे रोजी बोपखेल ता. हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

शहीद विनोद नामदेव भोईर यांचे वडील नामदेव भागाजी भोईर हे आर. डी. इंजीनियर्स दिघी, पुणे याठिकाणी नोकरीला असल्यामुळे त्यांचं वास्तव्य पुण्यामध्येच होते. विनोद यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, आयटीआय, पुणे येथेच पूर्ण केले. नंतर त्यांनी डीआरडीओ, पुणे येथे अप्रेंटीशीप करत असतांना बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर ९ मे २००८ रोजी त्यांना डिझेल मेकॅनिक म्हणून जनरल रिझर्व इंजीनियरिंग कोर्स दिघी, पुणे या ठिकाणी नियमित कामावर रुजु करुन घेतले होते.

त्यांना हॉलीबॉल, कबड्डी आणि क्रिकेट ह्या खेळामध्ये विशेष आवड होती. ते ग्राम क्रीडा मंच चिल्हेवाडी, तालुका जुन्नर, यामधून खेळायचे. त्याबाबत त्यांना अनेक पारितोषिकही मिळालेली आहेत.

दरम्यान अंत्यविधीच्या वेळी तहसीलदार हवेली, सेना दलाचे व पोलीस खात्याचे अधिकारी, बोपखेल गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि त्यांचे जवळचे भाऊबंद व नातेवाईक उपस्थित होते. त्यांना मानवंदना देऊन शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय