Thursday, December 26, 2024
Homeग्रामीणजुन्नर : वैष्णवधाम येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक युवक जखमी

जुन्नर : वैष्णवधाम येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक युवक जखमी

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील वैष्णवधाम येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक युवक जखमी झाला आहे. गोपाळ ज्ञानेश्वर पवार (वय ३९) असे या व्यक्तीचे नाव आहे. या हल्ल्यात बिबट्याचे दात आणि पंजाची नखे घुसून ही व्यक्ती जखमी झाली आहे.

गोपाळ पवार हे स्मशानभूमी पासून जात असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. ही घटना (ता.१८) रोजी रात्री आठच्या सुमारास वैष्णवधाम येथे घडली. त्यावेळी पवार यांना जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात आणून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

दरम्यान, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी म्हंटले आहे की, अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी बिबट्याकडून होणाऱ्या हल्ल्याबाबत वनविभागाने तातडीने कार्यवाही करावी असे आवाहन केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय