Friday, December 27, 2024
Homeराज्यपुण्यात 11वी LGBTQ अभिमान पदयात्रा यशस्वीरित्या संपन्न

पुण्यात 11वी LGBTQ अभिमान पदयात्रा यशस्वीरित्या संपन्न

पुणे : युतक चारिटेबल ट्रस्टच्या वतीने 11वी समलिंगी, उभयलिंगी, पारलिंगी व द्विलिंगी अभिमान पदयात्रा काढण्यात आली होती. द हमसफर ट्रस्ट, द ललित, केशवसुरी फाउंडेशन व बिंदू क्विअर् राइट्स फाऊंडेशन यांच्या मदतीने ही पदयात्रा यशस्वीरित्या पार पडली.

रविवारी पुण्यात LGBTIQA अभिमान पदयात्रा काढण्यात आली होती. छत्रपती संभाजीराजे गार्डन- जे. एम रोड-उजवीकडे वळून गुडलक चौक-एफ सी रोड-तुझ्या अजूनही वळून शिरोळे रोड ने पुन्हा मूळ ठिकाणी अशी ही पद यात्रा संध्याकाळी साडेचार ते साडेसहा दरम्यान काढण्यात आली होती. यावर्षीची अभिमान पदयात्रेची थीम ही कामाच्या ठिकाणी समलिंगी तृतीयपंथी साठी समावेशक धोरण असावे यासाठी होती.

युतक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अनिल उकरंडे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन तसेच आलेल्या सर्वाचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर व्यक्तींच्या प्रतिमांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर या संपूर्ण समुदायांनी एकत्रितपणे भारतीय राज्यघटनेचे उद्देशिका याचे मोठ्याने वाचन केले.

LGBTIQA ग्रुप आणि संस्था: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून यांची समाजासाठी काम करणाऱ्या सपोर्ट ग्रुप्स आणि सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला होता. सारखी ट्रस्ट नागपूर, अजिंक्य सातारा, नाशिक LGBTIQ नगर क्वीयर पुणेरी प्राइड फाउंडेशन पुणे सहभागी झालेले होते. त्याचबरोबर पालकांचा ‘सपोर्ट ग्रूप स्वीकार’ मुंबई देखील यात सहभागी झालेला होता. या चळवळीला समर्थन देणाऱ्या अनेक संस्था मासूम, कनेक्टिक, विदुला सायकोलॉजी कन्सल्टन्सी, यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज देखील यात्रेमध्ये सहभागी झालेल्या होत्या. 8 पेक्षा अधिक कॉर्पोरेट कंपन्यांनी या अभिमान यात्रेमध्ये सहभाग घेतल्याचे बघायला मिळाले. या अभिमान पदयात्रेमध्ये १३००-१४०० लोक सहभागी झाले होते.

ग्रांड मार्शल
महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे अधिकारी श्रीकांत देशपांडे या पदयात्रेसाठी ग्रांड मार्शल म्हणून चालले. पारलिंगी व्यक्तींना मतदानाचा हक्क मिळावा आणि त्याचबरोबर मतदान कार्ड मिळावे यासाठी श्रीकांत देशपांडे यांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. कोणताही डॉक्युमेंट शिवाय सहज पद्धतीने मतदान कार्ड मिळावे यासाठी यांनी दोन दिवसांचे शिबिर आयोजित केलेले होते. निवडणूक अधिकारी यांच्यासोबत पोलीस भरतीसाठी पात्र ठरलेल्या दोन पारलिंगी स्त्रिया आणि विजया यांनीही सहभाग घेतला होता.

या पदयात्रे दरम्यान “लक्षात ठेवा हे फक्त आम्हालाही नोकरीचा हक्क”. “नका करू दुजेपणा तृतीयपंथीयांना आपले म्हणा”. प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. एलजीबीटी अभिमान पदी यात्रेची सांगता 6.10 वाजता “हम होंगे कामयाब” या गाण्याने झाली.

 हे ही वाचा :

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्रातील 9 रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि 11 उड्डाणपूल, भुयारी मार्गांचे भूमिपूजन

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या

युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी ! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आहे तरी काय ? वाचा सविस्तर !

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

संबंधित लेख

लोकप्रिय